शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

रसिकांमध्ये चित्रसाक्षरता रुजायला हवी

By admin | Updated: March 19, 2015 00:27 IST

महाराष्ट्रात साहित्याबरोबर संगीत संस्कृती रुजली आहे. आज संगीताच्या अनेक मैफिली होतात, त्यावर चर्चा घडतात, समीक्षणही लिहिले जाते.

पुणे : महाराष्ट्रात साहित्याबरोबर संगीत संस्कृती रुजली आहे. आज संगीताच्या अनेक मैफिली होतात, त्यावर चर्चा घडतात, समीक्षणही लिहिले जाते. मात्र, चित्रकलेला अजूनही गांभिर्यतेने घेतले जात नाही. चित्रसाक्षरता अजूनही आपल्याकडे कमी आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी व्यक्त केले.सुरेश लोटलीकर यांनी साकारलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस होते प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे संस्थापक प्रकाश जोशी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, विजय पराडकर, प्रकाश जोशी, बाळासाहेब गांजवे, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार उपस्थित होते. सरस्वती लायब्ररी व साहित्यवेध प्रतिष्ठान पुणेच्या वतीने हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. आपल्यात चित्रसाक्षरता नसल्याचे मत शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन, तर शरद मांडे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन १९, २० मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते सायंकाळी ८ पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)४संमेलनाला रिकामटेकड्यांचा उद्योग म्हणणाऱ्या ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनाला येण्यास नकार दर्शविला आहे. पण या प्रदर्शनात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचे विशेष दालन ठेवण्यात आले आहे, त्यात नेमाडे यांच्याही अर्कचित्राचा समावेश आहे, त्यावर भाष्य करताना आम्ही नेमाडे यांना संमेलनाला घेऊन जात आहोत, पण ते अर्कचित्राच्या माध्यमातून! अशी खोचक टिप्पणी साहित्य सुनील महाजन यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. अर्कचित्रांची वारी घुमानला...४पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात माजी-संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रं प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती कैलास भिंगारे यांनी दिली. यामध्ये साहित्य महामंडळ व संमेलन संयोजन समितीने सहकार्याची भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.