शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये '४० लाखांचे गाढव विकणे आहे' : काय आहे ही भानगड घ्या जाणून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 17:41 IST

पुण्यात सध्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे ही जाहिरात धुमाकूळ घालताना दिसत आहे.

पुणे :  पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याच पुण्यात सध्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे ही जाहिरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. पुण्यात लागलेली ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर हिट झाली असून हडपसरकरांचे लक्ष वेधून घेत आहे.                       याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हडपसर भागात ४० लाखांचे गाढव विकणे आहे अशी पोस्टरबाजी अज्ञात व्यक्तीने केली आहे. गंमत म्हणजे यात गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून 'रेल्वेचे गेट' आहे. शहरातील मुख्य उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसरमधील ससाणेनगर-सैय्यदनगर येथे वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेले रेल्वे गेट एका वर्षात पाच वेळा बिघडल्याचे दिसून आले. लाखो रुपये खर्च करून बसवलेले हे गेटरुपी गाढव विकणे अशी पोस्टर लागली असून त्याची नागरिकही थांबून दखल घेताना दिसत आहेत.

                      दरम्यान स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्या आमदार निधीतून हे गेट बसवले आहे. मात्र त्यात अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे रेल्वे गेटवर अडकणारे सर्व त्रस्त नागरिक अशा नावाने हे पोस्टर लागले आहे. हे पोस्टर कोणी लावले याची चर्चा हडपसर परिसरात रंगली आहे. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सुरु झालेली ही अज्ञात पोस्टरबाजी कुठेपर्यंत जाते हेच बघणे औसुक्याचे ठरणार आहे.                   

टॅग्स :HadapsarहडपसरPoliticsराजकारण