शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रेम हवं तर असं : शहीद मेजर नायर यांची हृदयस्पर्शी लव्ह स्टोरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 17:39 IST

खऱ्या प्रेमाला ना वयाचे बंधन, ना जात,पात, धर्माची भीती. असतात फक्त एकमेकांशी जुळलेले प्रेमाचे धागे. ही कहाणी आहे शहीद मेजर शशिधरन नायर यांची. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी मातृभूमीच्या रक्षणात धारातीर्थी पडलेल्या या रियल हिरोची प्रेम कहाणीही कायम लक्षात राहणारी आहे. 

पुणे : खऱ्या प्रेमाला ना वयाचे बंधन, ना जात,पात, धर्माची भीती. असतात फक्त एकमेकांशी जुळलेले प्रेमाचे धागे. ही कहाणी आहे शहीद मेजर शशिधरन नायर यांची. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी मातृभूमीच्या रक्षणात धारातीर्थी पडलेल्या या रियल हिरोची प्रेम कहाणीही कायम लक्षात राहणारी आहे.                  अगदी लहानपणापासून सैन्यात जाण्याच्या वेडाने पछाडलेल्या शशीला कधी प्रेम करायला वेळचं  नव्हता. शिक्षण संपल्यावर आणि सैन्यात रुजू झाल्यावर एका मित्राच्या घरी त्याची तृप्ती यांच्याशी पहिली भेट झाली. २७ वर्षाचा हा उमदा आणि काहीशा अबोल कॅप्टन पाहताच क्षणी आपल्या प्रेमात पडल्याची जाणीवही त्यांना नव्ह्ती. अखेर मित्रांनी मध्यस्थी केली सहा महिन्यात त्यांचा साखरपुडासुद्धा झाला. लग्न आणि साखरपुड्याच्या दरम्यान असणारे गोड क्षण पूर्ण अनुभवलेही नव्हते पण त्याआधीच तृप्ती यांना एका आजाराने घेरले. या आजारामुळे  त्यांच्या हालचाली कमी व्हायला लागल्या. पण यावरही थांबेल ती नियती कसली ? तिला तरीही त्यांच्या नशिबाची परीक्षा बघायची होतीच. दुसरीकडे मित्रमंडळी शशी यांना लग्न मोडण्याचा सल्ला देत होते. पण तृप्ती यांच्या प्रति असलेलं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. अखेर त्यांनी लग्न केले पण संकटं पाठ सोडत नव्हती. लग्नानंतर काहीच महिन्यांनी तृप्ती यांचा पुन्हा वाढला  आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा कमरेखालचा भाग काम करेनासा झाला. त्यांना व्हीलचेअर शिवाय वावरणे कठीण झाले. अगदी शशी यांच्या अंत्यदर्शनासाठीही त्या व्हीलचेअरवर होत्या.                पण तरीही हे जोडपं आहे त्या परिस्थितीत आयुष्याचा आनंद घेत होते, सहजीवन अनुभव होते. त्यांचे सोशल मीडियावर दिसणारे फोटो त्यांच्या डोळ्यातला आनंद प्रतीत करणारे आहेत. आज 'व्हॅलेंटाईन डे'. मेजर शहीद होऊन अजून महिनाही पूर्ण झालेला नाही. पण त्यांच्या शौर्याच्या आणि प्रेमाच्या आठवणी येणाऱ्या पिढीला कायमच बळ देणाऱ्या ठरणार आहेत. भारतमातेचा पुत्र म्हणून तर त्यांना सलाम आहेच पण जोडीदार, सच्चा प्रेमी म्हणून त्यांनी घातलेल्या आदर्शामुळे आदर वाढला आहे. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेMartyrशहीद