शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

धोकादायक बस थांब्यांची पाहणी, बीआरटीच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 03:24 IST

सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अद्यापही पूर्ण झाले नाही.

धनकवडी : सातारा रस्ता बीआरटी मार्गाचे रखडलेले काम, धोकादायक बस थांबे यामुळे प्रवाशांचे होणारे हाल याबाबत माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक ठिकाणांची पाहणी केली.

सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अद्यापही पूर्ण झाले नाही. काम होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत प्रशासनाने अनेक वेळा आश्वासने दिली होती. मात्र अजूनही  काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे धनकवडी - कात्रजमधील नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना  सामोरे जावे लागत होते.  प्रवाशांना रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून धोकादायक पद्धतीने बसमध्ये चढावे-उतरावे लागत होते. ‘लोकमत’ने याबाबत वाचा फोडली आणि या सर्व समस्यांची माहिती नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी पुण्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना दिली. सदरील काम वेळेत पूर्ण झाले नाही व प्रवाशांच्या जीविताची काळजी घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रशासनाच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका राणी भोसले, स्मिता कोंढरे, मानसी देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर उपस्थित होते.नागरिकांना भेडसावणाºया अडचणी...१ धनकवडी भागातील श्री सद्गुरू शंकरमहाराज परिसर, अहिल्यादेवी चौक, बालाजीनगर बस थांबा या ठिकाणी नागरिकांना भेडसावणाºया अडचणी, तसेच होणारी दुर्घटना या ठिकाणी अपघात होऊ शकतो, या बाबी अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. २ या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, बीआरटी रस्त्याचे सल्लागार व इतर मनपा अधिकाºयांनी बीआरटी मार्गावर काय अडचणी आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी केली. ३ याबाबत अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी अधिकाºयांबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ व या परिसरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवू, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणे