सोमवारी (दि.४) सकाळच्या ९ च्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली होती. सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलाचा परिमाण पिकांवर होत आहे. कोरोनातील लॉकडाऊन, दोन वेळची अतिवृष्टी, वारंवार होणार्या ढगाळ वातावरण यामधून सावरतोय तोच आता पुन्हा नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाच्या बदलामुळे ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, मका याबरोबर पालेभाज्यांबर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. जर अचानक वादळी वाऱ्याचा पाऊस झाला तर पालेभाज्यांची नासाडी होईल आणि हुरड्यात आलेले ज्वारीचे पीक भुईसपाट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
————————————————
ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे चित्र.
०७०१२०२१-बारामती-१९