शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस शवदाहिनी घोटाळ्याची चौकशी

By admin | Updated: July 7, 2017 03:41 IST

सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी घोटाळ्याप्रकरणी अखेर पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांची खातेनिहाय

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी घोटाळ्याप्रकरणी अखेर पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले असून चौकशी पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. महापालिकेतील पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारायण कुलकर्णी, उपअभियंता मनोहर टेकचंद जावरानी, कनिष्ठ अभियंता विकास विठ्ठल घारे, लेखाधिकारी किशोर बाबूराव शिंगे आणि उपलेखापाल उषा सतीश थोरात अशी खातेनिहाय चौकशी सुरू केलेल्यांची नावे आहेत.सांगवीसह शहरातील विविध पाच स्मशानभूमींत गॅस शवदाहिनी बसविली होती. यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च आला. गॅस शवदाहिनी बसविण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सीमा सावळे यांनी केला होता. त्यानंतर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चौकशी समिती नेमली होती. समितीत सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता अयुबखान पठाण आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांचा समावेश होता. या चौकशीत नियमाचे उल्लंघन केल्याचे ताशेरे ओढले होते. पालिकेत सत्तांतरानंतर सीमा सावळे यांनी चौकशीचा आग्रह धरला होता.महापालिकेची आर्थिक फसवणूक‘सांगवी येथील गॅस शवदाहिनी खरेदी प्रक्रिया राबविलेली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे. इतर पाच ठिकाणांची निविदा प्रक्रिया निष्काळजीपणे अभ्यास न करता प्रस्तावित केली. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान व फसवणूक झाले असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. पंधरा दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषारोपत्र दाखल करण्याच्याही सूचना दिल्या.