पुणे : तब्बल २० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सोहमला वाचविण्यासाठी एक इंचाच्या वीस फूट पाइपमध्ये दोरी घालून त्याचा फासा बनविला आणि दुस-या हातात तेवढाचा लांब लोखंडी रॉड घेऊन या सोहमचे दोन्ही हात फासात अडकवून त्याला वर ओढण्यास सुरुवात केली. अखेर बारा वाजून सात मिनिटांनी सोहम बाहेर आला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. हा चित्तथरारक अनुभव आहे अग्निशमदलामधील फायरमन चंद्रकांत नारायन आनंददास यांचा.पुरंदर तालुक्यातील लोळे वस्ती येथील सोहम राहुल यादव हा अडीच वर्षाचा मुलगा बुधवारी बोअरवेलमध्ये पडला होता. सोहमला बाहेर काढण्यासाठी पुरंदर तहसिलदारांनी सायकांळी पुणे अग्निशमनदलाकडे मदत मागितली. अग्निशमनदलाचे पथक पोहचेपर्यंत ग्रामस्थांनी दोन जेसीबी आणि एका पोकलेनच्या मदतीने सोहम पडलेल्या बोअरवेलपासून सात फूट अंतरावर समांतर खड्डा खोदण्यास सुरुवात केली होती. १२ ते १५ फूट खोदण्यात आल्यानंतर खड्ड्यात पाणी पाझरू लागले होते. त्यामुळे आणखी खड्ड्या घेतल्यास बोअरवेलमध्येही पाणी घुसण्याची तसेच माती पडण्याची शक्यता होती.
बोअरवेलमधून सोहमला वाचविण्याचा अभिनव प्रयोग
By admin | Updated: August 7, 2015 01:15 IST