शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महसुली तंटे मिटवण्याचा राज्यात नावीन्यपूर्ण प्रयोग' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:22 IST

खेड तालुक्यातील पोलीस पाटलांनी गावाला अभिमान वाटावे, असे काम करावे. गावपातळीवरचे वादविवाद, तंटे गावातच मिटवावेत

दावडी  - खेड तालुक्यातील पोलीस पाटलांनी गावाला अभिमान वाटावे, असे काम करावे. गावपातळीवरचे वादविवाद, तंटे गावातच मिटवावेत तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता नि:स्वार्थीपणे दोन्ही बाजूने वाटाघाटी करून पक्षपातीपणा न करता न्याय देण्याची भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस पाटील बैठकीत बोलताना केले.खेड पंचायत समितीत तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद पोलीस पाटलांना मार्गदर्शनपर बोलत होते. महसूल लोक अदालतीचे व न्यायालय न्यायालयातील प्रलंबित असणाऱ्या अर्धन्यायिक अपील प्रकरणांमध्येतडजोडीने वाद मिटवण्यासाठी पोलीस पाटलांनी काय काय प्रयत्न करायचे, याबाबत मार्गदर्शन करत आले.आपल्या आपल्या गावातील प्रत्येक पोलीस पाटलांना गावातील महसुल दाव्याची यादी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे संबंधित पक्षकार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामधील वाद सामोपचाराने वाटाघाटीने मिळवण्याच्या दृष्टिने पोलीस पाटलांनी प्रयत्न करावयाचा आहे. त्यासाठी त्यांना योग्य ते सूचनांचे पालन करून तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, आयुष प्रसाद यांनी सांगितले.कोणत्याही राजनैतिक गटाचा नसावा, गुंड व्यक्तीचा याकामी हस्तक्षेप होणार नाही यावरही पोलीस पाटलाने महत्त्वाची भूमिका पार पाडावी.यावेळी गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, खेड तालुका पोलीस संघटना अध्यक्ष रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे , खेड पोलीस पाटील महिला आघाडीच्या तृप्ती मांडेकर यांच्यासह विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.काही प्रकरणात चर्चा वाटाघाटी अंती तडजोड घडून येत असेल अशा प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी सर्व पक्षकारांच्या स्वाक्षºया घेऊन ओळखपत्र संबंधित पक्षकार यांना महसूल लोक अदालतसाठी उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयात उपस्थित राहून तडजोड नामा सादर करावा.खेड तालुक्यात महसुली दावे दोनशे एकोणीस आहे त्यापैकी शंभर तरी दावे निकाली निघाले पाहिजे, असा सल्ला आयुष प्रसाद यांनी पोलीस पाटलांना दिला.महसुल लोक अदालतीमध्ये दोनशे एकोणीस महसुली दावे आहेत. त्यापैकी ५० दावे पोलीस पाटलांनी तडजोड करून मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. २५ डिसेंबरपर्यंत अजून गावातील महसुली तंटे त्या-त्या गावच्या पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यामार्फत मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-बाळासाहेब शिंदे,राज्य पोलीस पाटील संघाचे सरचिटणीस

टॅग्स :Puneपुणे