शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपंग शिक्षकांवर होतोय अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:45 IST

जिल्ह्यातील स्थिती : दुर्गम ठिकाणी दिली आस्थापना

नेरे : पुणे जिल्हा परिषद येथे मे २०१८ मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रँडम राऊंडनुसार पदस्थापना दिल्या होत्या. दिव्यांग, अपंग शिक्षकांचाही यामध्ये समावेश होता. शासन निर्णयानुसार अपंग शिक्षकांना सुगम भागातील सोयीच्या शाळा देणे गरजेचे असतानाही अवघड, अतिअवघड क्षेत्रात शाळा दिल्याने दैनंदिन प्रवास जिकिरीचा बनला आहे. एकूणच जिल्ह्यातील अपंग शिक्षकांवर शासनाकडून घोर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.

शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रथम प्राधान्याने अपंग शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने शाळा देणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही. ही बाब ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्या लक्षात आली. त्यामुळे १० आॅगस्ट २०१८ रोजी शासन पत्र काढून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवघड शाळेत पदस्थापना मिळालेल्या दिव्यांग, अपंग शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे सर्व अधिकार दिले होते. इतर जिल्ह्यांत या पत्रानुसार विनाअट अपंग शिक्षकांना तत्काळ शाळा बदलून देण्यात आल्या. पण पुणे जिल्ह्यात तसे झाले नाही. परिणामी या अपंग शिक्षकांना रुजू असलेल्या दुर्गम क्षेत्रातील शाळांवर जाणे त्रासदायक बनत आहे. प्रशासनाने अपंग शिक्षकांना लवकरात लवकर दुर्गम भागातील पदस्थापना बदलून सुगम भागातील शाळा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.पुणे जिल्ह्यात शासकीय आदेशाचे पालन नाहीइतर जिल्ह्यांत या पत्रानुसार विनाअट अपंग शिक्षकांना तत्काळ शाळा बदलून देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात मात्र अपंगांना प्रमाणपत्र व शारीरिक तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणी होऊन अहवाल प्राप्त करून २ महिने झाले तरी याबाबत प्रशासनाकडून अपंग शिक्षकांच्या पदस्थापना बदलीबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप केलेली नाही. 

टॅग्स :Puneपुणे