शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उच्च शिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करुन छळ करणार्‍या उद्योजक पती व कुटुंबातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उच्च शिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करुन छळ करणार्‍या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह ८ जणांवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक हिंसाचार, गंभीर मारहाण, धमकावणे, फसवणुक करणे अशी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा.औंध) सोनाली दीपक गवारे, दीपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड), दीपाली वीरेंद्र पवार (रा. औंध, पुणे), भागीरथी पाटील (रा. औंध), राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पीडित विवाहिता सांगोला तालुक्यातील प्रतिष्ठित घराण्यातील आहे. त्यांचा गणेश गायकवाड यांच्याशी विवाह झाला होता. तेव्हापासून दागिने आणि हुंड्याच्या कारणावरुन पीडितेला सातत्याने त्रास दिला जात होता. लग्नाची चांदीची भांडी व देवपुजेचे साहित्य, पीडितेचा पासपोर्ट, पदवी प्रमाणपत्र, पॅनकार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रेही गणेश याने तिला त्रास देण्याच्या हेतूने फसवणूक करुन सुस गावातील फार्म हाऊसवर दडवून ठेवली आहे, असा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.

पती गणेश याने तिला मारहाण करताना कानावर मारल्याने तिचा उजवा कान पूर्णपणे बधीर झाला असून तिला ऐकू न येण्याचा त्रास सुरु झाला आहे.

गायकवाड कुटुंब हे औंध परिसरातील प्रतिष्ठित कुटुंब आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. गणेश हा दारु पिऊन पत्नीचा छळ करत होता. तिला त्याने सिगारेटचे चटकेही दिले. तसेच मला तुझी गरज नाही. भरपूर अ‍ॅटम आहेत, असे म्हणून तिचा मानसिक छळही करत होता, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.