शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

अपात्र उमेदवार अधिकारी प्रशिक्षणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:56 IST

अग्निशमन दलातील सर्वोच्च अशा विभागीय अग्निशमन अधिकारी अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरल्याचा अभिप्राय नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजने देऊनही,

विशाल शिर्केपुणे : अग्निशमन दलातील सर्वोच्च अशा विभागीय अग्निशमन अधिकारी अभ्यासक्रमासाठी अपात्र ठरल्याचा अभिप्राय नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजने देऊनही, त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे विभागीय अधिकारी आणि सहायक विभागीय अधिकाºयांच्या मिळून तीन जागा रिक्त असताना आठ अधिकाºयांना या अभ्यासक्रमासाठी पाठविण्याचा कारभार अग्निशमन दलाने केला आहे. यातील दोन अधिकारी सहा महिन्यांचे प्रशिक्षण आटोपून आले असून, दोघे या महिन्यात रवाना झाले आहेत.अग्निशमन दलातर्फे सब आॅफिसर, स्टेशन ड्युटी आॅफिसर आणि डिव्हिजनल आॅफिसर कोर्स घेण्यात येतात. नागपूर येथील महाविद्यालयात अग्निशमनचे उच्च अभ्यासक्रम चालतात. पदोन्नतीसाठी देखील याचा उपयोग होतो. डिव्हिजनल आॅफिसरचा अभ्यासक्रम केल्यास पुढे राज्याचा अग्निशमन संचालक पदावरील संधीदेखील संबंधिताला मिळू शकते. त्यामुळे अग्निशमन दलातील अधिकाºयांना कोर्सचे महत्त्व असते.पुणे अग्निशमन दलातील प्रभाकर उम्राटकर, राजेश जगताप, समीर शेख, शिवाजी मेमाणे, संजय रामटेके, प्रकाश मोरे आणि प्रमोद सोनावणे या अधिकाºयांची नावे विभागीय अग्निशमन अधिकारी (डिव्हिजनल आॅफिसर) अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजने या सर्व अधिकाºयांच्या नावावर ‘अपात्र’तेची मोहोर उमटविली होती. डिव्हिजनल अ‍ॅफिसरपदासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना व २ वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. तसेच त्यांनी सब आॅफिसर व स्टेशन आॅफिसर अ‍ॅण्ड इन्स्ट्रक्टर अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्राथमिक निकषाचीदेखील पूर्तता या अधिकाºयांनी केली नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.पुणे अग्निशमन दलाने या अटी राज्य अग्निशमन संचालनालयाकडून शिथिल करून या अधिकाºयांची अभ्यासक्रमासाठी निवड केली. यातील आठवे अधिकारी गजानन पाथ्रुडकर यांचे नाव ऐन वेळी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.पुण्यात विभागीय अग्निशमन अधिकारीपदाची तीन पदे रिक्त असून, त्यातील १ पद भरलेले आहे.तर दोन पदे रिक्त आहेत. सहायक विभागीय अग्निशमन अधिकाºयांचे एकच पद रिक्त आहे. म्हणजेच या पदावर तिघा जणांचीच वर्णी लागू शकते. मग, आठ जणांना नियमात शिथिलता देऊन थेट डिव्हिजल आॅफिसर पदाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.डिव्हिजनल आॅफिसर पदाची पात्रताया कोर्ससाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावाउमेदवाराने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा नागपूरचा स्टेशन आॅफिसरचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यकअग्निशमन दलात किमान २ वर्षे स्टेशन आॅफिसर अथवा ५ वर्षे सब आॅफिसर म्हणून सेवा पूर्ण केलेली असावीजड वाहन परवाना आणि २ वर्षे जड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यकपात्रतेच्या यानिकषांची पूर्तता नाहीपुण्यातील उमेदवार समीर शेख यांनी स्टेशन आॅफिसरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. प्रमोद सोनवणे, संजय रामटेके, प्रकाश गोरे, प्रभाकर उम्राटकर, राजेश जगताप आणि शिवाजी मेमाणे यांनी स्टेशन आॅफिसरचा अभ्यासक्रम पूर्ण केला नसून, त्यांच्याकडे जड वाहन चालविण्याचा परवाना तथा दोन वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव नसल्याने ते अपात्र असल्याचा शिक्का नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजने मारला होता.स्थायी समितीची डोळे झाकून मान्यता !महापालिकेच्या स्थायी समितीने अग्निशमन दलातील ८ जणांच्या २२ आठवडे कालावधीच्या प्रशिक्षणाला ५ एप्रिल २०१७ रोजी मान्यता दिली. त्यासाठी प्रत्येक अधिकाºयामागे ६० हजार असे ४ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रशिक्षणाचा काळ सेवा काळ धरत असल्याने, त्याचे वेतनहीसंबंधित अधिकाºयांना मिळते. नियम अटी शिथिल करणेआणि गरज नसताना अधिक अधिकाºयांना प्रशिक्षण दिलेजात असल्याचा प्रकारस्थायीतील जाणकारांच्या लक्षात कसा आला नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.एका कर्मचाºयाने वेधले होते लक्षअग्निशमन दलाकडे विभागीय अधिकारी अथवा त्यावरील जागाच शिल्लक नसल्याने ८ जणांची विभागीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड करणे योग्य नाही. शिवाय पात्र नसताना अटींमध्ये शिथिलता देऊन त्यांना या अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात येत आहे. यातील एका कर्मचाºयाला तीन अपत्ये आहेत. त्यामुळे सरकारच्या नियमानुसार अभ्यासक्रमानंतरही संबंधिताला पदोन्नती मिळू शकणार नाही. मग, सरकारी पैशाचा अपव्य करीत इतक्या व्यक्तींना अभ्यासक्रमासाठी पाठविण्याची गरज नसल्याचे पत्र एका कर्मचाºयाने महापालिका आयुक्तांना २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाठविले होते.