शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत मल्टिफ्लोअर इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स

By admin | Updated: October 13, 2016 01:33 IST

राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या उद्योगनरीत औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी लघु, सूक्ष्म उद्योजक आणि मध्यम व इतर उद्योगांंची भरभराट होण्यासाठी

पिंपरी : राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या उद्योगनरीत औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी लघु, सूक्ष्म उद्योजक आणि मध्यम व इतर उद्योगांंची भरभराट होण्यासाठी राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मल्टिफ्लोअर कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आवश्यक असणारी जागेऐवजी त्यांना व्यवसाय करण्यासाठी थेट बांधलेला गाळा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे़ गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक छोटे व्यावसायिक अपुऱ्या जागा आणि असुविधांमुळे त्रस्त झाले होते़ एमआयडीसीच्या जागेत छोटासा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते़ मात्र, शहरातील विविध संघटनांनी सरकारने लघु, सूक्ष्म, मध्यम आणि इतर उद्योगांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने केली होती़ त्यामुळे सरकारने पिंपरी -चिंचवड औद्योगिकनगरीत मल्टिफ्लोअर कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाने अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लघु उद्योजकांच्या व्यावसायिक जागेसंदर्भात अडचण दूर होणार आहे़ एमआयडीसीत सध्याच्या जागा अपुरी पडत असल्यामुळे शासनाच्या वतीने उपलब्ध जागेवर मोठ्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे़ त्यामध्ये लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योजकांना ९९ वर्षांच्या करारावर गाळा देण्यात येणार आहे़ या योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जागेत मल्टिफ्लोअर इमारतीची निर्मिती करण्यात येणार असून, छोट्या उद्योजकाला कमीत कमी भाड्याच्या दरात गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ गेल्या काही दिवसांपासून लघुु उद्योजकांना अस्वच्छता, पाण्याची कमतरता, विजेची तारांबळ, रस्त्यांची दुरवस्था यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता़ या अडचणीतून सुटका होणार असल्यामुळे उद्योजकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे़ (प्रतिनिधी)