भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद

By admin | Published: November 29, 2014 12:14 AM2014-11-29T00:14:35+5:302014-11-29T00:14:35+5:30

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कलावंतांनी मॉरिशस, दुबई, साउथ आफ्रिका या देशांत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडविले.

Indian musical fame abroad | भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद

भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद

Next
पिंपरी : इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स  यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कलावंतांनी मॉरिशस, दुबई, साउथ आफ्रिका या देशांत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडविले. पंडित अप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य हार्मोनियमवादक संतोष घंटे  यांनी सादर केलेल्या कलाविष्कारास दाद मिळाली.
महाराष्ट्रातून एकमेव कलावंत म्हणून घंटे यांची निवड झाली होती. याविषयी घंटे म्हणाले, ‘‘भारतीय संगीत प्रसाराच्या उद्देशाने विविध देशात सोलो हार्मोनियमवादन झाले. तिथे मला अप्पांचे अनेक चाहते भेटले. सोलोव्यतिरिक्त  हार्मोनियम या वाद्याचा भोजपुरीच्या  अंगाने अभ्यास करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदवाणी, डर्बन साउथ आफ्रिका येथील रेडिओ वाहिनीसाठी विशेष रेकॉर्डिग केले. दिल्लीचे अनुराग रस्तोगी (बासरी), डॉ. पुष्पा प्रसाद (गायिका), कन्हैय्याजी (ढोलक),  सतीश  सोलंकी (ताल वाद्य) व विसम मलिक यांचाही सहभाग होता. इंदिरा गांधी सेंटर फॉर इंडिअन कल्चर 
आदी ठिकाणी कार्यक्रम झाले. 
शिवनंदा वल्र्ड पीस फाउंडेशन येथे आंतरराष्ट्रीय हार्मोनियमवादक म्हणून गौरव केला. आपल्या संगीत संस्कृतीला मिळणारी दाद पाहून आनंद झाला.’’ (प्रतिनिधी)

 

Web Title: Indian musical fame abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.