शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भारताला राष्ट्रीय खेळच नाही, माहिती अधिकारात बाब उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:19 IST

कोणीही जर आपणाला प्रश्न विचारला की भारत देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर अगदी सहजपणे आपण सांगतो की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.

अभिजित डुंगरवालबिबवेवाडी : कोणीही जर आपणाला प्रश्न विचारला की भारत देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर अगदी सहजपणे आपण सांगतो की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. कारण लहानपणापासुनच आपल्याला शालेत हे शिकविण्यात आले आहे. आणि आजही विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हेच शिकविण्यात येते की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.परंतु जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशाला राष्ट्रीय खेळच नाही. माहितीच्या अधिकारात हे उघड झाले आहे. पुण्यातील सत्यम सुराणा या युवकाने केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडे काही दिवसांपूर्वी भारताच्या राष्ट्रीय खेळाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत खुलासा मागितला होता. त्याचे उत्तर असे आले की युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने कुठल्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही. या बाबतची कोणतीही अधिसूचना मंत्रालयाने आजपर्यन्त काढ़लेली नाही. म्हणजेच भारत देशाला आज कोणतही राष्ट्रीय खेळ नाही.माहिती आधिकार कार्यकर्ता सत्यम सुराणा सध्या १२ वीमध्ये शिकत आहे. सामाजिक कार्याची आवड त्याला आहे. विविध सामाजिक कार्यांत तो असतो.1 आता या सगळ्यात हा प्रश्न आश्चर्याचा आहे, की ज्या देशाने १९२८ पासून आॅलिंपिक स्पर्धांमध्ये हॉकी खेळण्यास सुरूवात केली व १९२८ पासून १९५६ पर्यंत अनेक वेळा सुवर्णपदक पटकावले. त्या भारत देशाचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही.2 तसेच आपल्या देशात कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून दर्जा मिळालेला नाही. जगातील सर्व देशांना आपापले राष्ट्रीय खेळ आहेत. मग भारताला का नाही, हा प्रश्न या वेळी उद्भवतो. तरी सुद्धा आजतागायत सर्व शाळांमध्ये हे शिकविण्यात येते की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मग ही चुकीची शिकवणी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.