शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

इंदापूरची जागा काँग्रेसचीच, काँग्रेसच्याच वाट्याला येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:23 IST

आपल्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते माझी जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष्याला घेणार आहेत, असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

बिजवडी : इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलाना सुटणार की नाही याबाबतची चर्चा सर्व कार्यकर्त्यांनी थांबवावी कारण आपल्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते माझी जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष्याला घेणार आहेत, असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.इंदापूर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने निकिता लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता संवाद शिबीरात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, आमदार विश्वजित कदम,सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे,पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप ,अंकिता पाटील आणि विश्वास मेहेंदळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.हर्षवर्धन पाटील म्हणाले आपली लढाई आता जीवन मरणाची आहे कारण गेल्या पाच वर्षात आपल्याला किती त्रास सहन करावा लागला, पाच वर्षात शेतीला एकदाही पाणी मिळाले नाही एम आई डी सि मध्ये एकही नवीन कारखाना आला नाही, तालुक्यात १०० रुपयांची गुंतवणूक देखील झाली नाही, मराठी शाळेची एकही नवीन खोली बांधली नाही, माध्यमिक विद्यालयात एकही नवीन तुकडी नाही आणि एकही नवीन अंगणवाडी नाही. आपल्या शेतीला पाणी न मिळाल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.कार्यक्रमास नागराध्यक्ष अंकिता शहा, कृष्णा यादव, उदयसिंह पाटील, मयूर पाटील, मुकुंद शहा, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, सुनील कणसे आणि रवींद्र साबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.>तरुणांनी पाटील यांचा आदर्श घ्यावा : कदमविश्वजित कदम म्हणाले राजकीय प्रवासाची दिशा ठरवताना मंत्रिमंडळात तरुणांनी कसे काम करावे याचा आदर्श हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिला आहे. बावड्याच्या पाटील घराण्याने नेहमीच काँग्रेस पक्ष्याच्या विचाराचे काम केले आहे व आपल्या कामाचा राज्यात वेगळाच ठसा उमटवला आहे. इंदापुरची जागा ही काँग्रेस ची आहे आणि काँग्रेसशी चीच राहणार.त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता न करता राज्याचे नेतृत्व आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी एकदिलाने कामाला लागले पाहिजे असे सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९