शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर होणार हगणदारीमुक्त

By admin | Updated: November 25, 2015 00:58 IST

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत.

इंदापूर : येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत. याबाबत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली .नगराध्यक्ष अशोक इजगुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, आरोग्य विभागाच्या सभापती कमल पवार यांनी सांगितले, की, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी केंद्र शासनाने ८ हजार रुपये व राज्य शासनाने ४ हजार असे एकूण १२ हजार रुपयांचे अनुदान प्रत्येक शौचालयास देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण शहर हगणदारीमुक्त झाल्यानंतर राज्याच्या जिल्हा व राज्यस्तरीय समित्या त्याची पाहणी करणार आहेत. त्यांचा सकारात्मक अहवाल गेल्यानंतर नगरपरिषदांच्या श्रेणीनुसार ‘अ’ वर्ग पाच कोटी रुपये, ‘ब’ वर्ग तीन कोटी रुपये, ‘क’ वर्ग दोन कोटी रुपये या प्रमाणे सादरीकरणाचे अनुदान दिले जाणार आहे. काम समाधानकारक नसल्यास सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानावर टाच येणार आहे. ५३० कुटुंबांनी शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळण्यासाठी, नगरपरिषदेकडे अर्ज सादर केले आहेत. त्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ५० कुटुंबांचे अर्ज आॅनलाईन जमा करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार सर्वेक्षण करून इतर कुटुंबे निश्चित करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यास जागा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी चार-पाच कुटुंबांसाठी एक याप्रमाणे सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कामठे म्हणाले, की उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा पथकाद्वारे गांधीगिरी करून त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे. आठ-दहा दिवसांच्या कालावधीत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. अन्यथा सबंधितांची हलगीच्या तालावर मिरवणूक काढून, इंदापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द तक्रारी दिल्या जाणार आहेत. ही मोहीम शहर हगणदारीमुक्त होईपर्यंत सुरूच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)पहिल्या आठवड्यात नगरपरिषद सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समिती, स्वच्छताविषयक चळवळ राबवणाऱ्या ‘ग्राम कुटा’ या संस्थेचे त्यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे पाहणी करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेवून त्यांना समज देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन महिला व दोन पुरुष कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. - नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, नगर परिषद