त्याबद्दल इंदापूर सायकल क्लबच्या वतीने रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
कोणत्याही प्रकारचा बॅकअप नसताना एकट्याने चारशे तीस किलोमीटर अंतर सायकलवर पार केले. या प्रवासादरम्यान आरोग्यविषयक व पर्यावरणविषयक संदेश देत त्यांनी ही वारी पूर्ण केली तसेच सायकलवर जाऊन गड-किल्ले पाहणे याची मजा काही औरच असते असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबद्दल इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले व यापुढे अशा साहसी सायकल राईड करणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.
यावेळी क्लबचे सदस्य दशरथ भोंग, प्रशांत सिताप, स्वप्निल सावंत, समीर विंचू, संजय शिंदे, ज्ञानदेव डोंगरे, अनिल घेरडे, उमेश राऊत इत्यादी उपस्थित होते.
२२ इंदापूर सायकल वारी
इंदापूर येथे रमेश ( आबा ) शिंदे यांचा सन्मान करताना इंदापूर सायकल क्लबचे सदस्य.