शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पुणेकरांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

लॉकडाऊन कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे बंद झाले होते. त्यामुळे मागील वर्षी कोरोना काळात ब-याच विषाणूजन्य ...

लॉकडाऊन कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे बंद झाले होते. त्यामुळे मागील वर्षी कोरोना काळात ब-याच विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले होते. परंतु, आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाॅईड, चिकुनगुनिया, काविळच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात.

जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘गेल्या दोन आठवड्यांत या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे तापाचे असतात. या रुग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कोरोना रुग्ण कमी होत असल्याने या रुग्णसंख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.’

पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती प्रकाश कोटला म्हणाले, ‘पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅइड आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. जुलै २०२१ मध्ये १० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर १ चिकुनगुनियाचा रुग्ण आढळून आला होता. आता या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून दररोज डेंग्यू, टायफाॅइड आणि चिकुनगुनियाचे १० ते १५ रुग्ण चाचणीसाठी येतात. यातील ५० टक्के रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो आहे. वेळीच निदान झाल्यास पटकन उपचार होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणून ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणे गरजेचे आहे.’

चिकुनगुनियाचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप हे आहे. या आजाराची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण त्यासोबत सांध्यांच्या तीव्र वेदना, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही देखीललक्षणे आहेत. डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांमागे दुखणे ही लक्षणे आहेत. याशिवाय डेंग्यूमुळे रक्तस्राव होत असल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.

----------------

काय काळजी घ्यावी?

सध्या मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांनी विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते, यामुळे डेंग्यू व चिकुनगुनिया हा आजार होतो. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करा, घराबाहेर पाणी साचू देऊ नका, परिसरात वेळोवेळी फवारणी करा आणि डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. म्हणून ताप जास्त दिवस असल्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

------------

डेंग्यूचे रुग्ण :

महिनासंशयितपॉझिटिव्ह

जानेवारी २७५ २२

फेब्रुवारी ७९ ०६

मार्च १९१ ०२

एप्रिल १६९ ०१

मे १६२ ०

जून २०१ ०

जुलैै १०७ ८६

आॅगस्ट ८७ १८

---------------

शहरातील आकडेवारी : (जानेवारी ते आॅगस्ट २०२१)

स्वाईन फ्लू - ६५

चिकुनगुनिया - ८४

डेंग्यू - १३५

मलेरिया - २

-------------------