शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे फुफ्फुसाच्या विकारांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:59 IST

पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईनंतर पुण्याच्या काही भागांत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरखाने तयार होत आहेत.

पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईनंतर पुण्याच्या काही भागांत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरखाने तयार होत आहेत. परंतु याचा परिणाम थेट नागरिकांवर होत असून, कबुतरामुळे पुणेकरांमध्ये फुफ्फुस व श्वासाचे विकार वाढत असल्याचे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. याबाबत नागरिकांममध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.सह्याद्र्रि हॉस्पिटल येथे फुफ्फुस विकार व थोरॅसिक सर्जरी विभाग (छातीचा पिंजरा) सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन कॅनडा येथील युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटिश कोलंबिया हॉस्पिटलच्या लॅबोरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अँड्रयु चुर्ग, युनिट हेड डॉ. केतन आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. दीपा दिवेकर, पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी, जनरल थोरॅसिक व थोरॅकोस्कोपी सर्जन डॉ. संजय कोलते आणि सह्याद्रि हॉस्पिटलचे इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ इंटरस्टिशिअल लंग डिसीजेस या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन समिती अध्यक्ष डॉ. महेंद्र कावेडिया, वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी पुण्यात कबुतरांचे प्रमाण वाढत असून, यांचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टारांनी सांगितले.याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, की कबुतरांची विष्ठा आणि पिसं यांच्यासोबत वाळलेल्या विष्ठेतून अस्परजिलस प्रकारची बुरशी निर्माण होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅलर्जी आणि धाप लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कबुतरांची विष्ठा बंद घरांमध्ये, घराच्या खिडकीमध्ये साफसफाई न झाल्याने तशीच राहिली तर त्यातून श्वसनमार्गाला धोकादायक असे वायू तयार होऊन त्यातूनही फुफ्फुसांचे संसर्ग वाढतात. कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या सीरममधील न्यूमोनायट्रेसचा संसर्ग होऊन सतत थकवा येणे, झोप येणे, निरुत्साह वाटत असल्याच्या तक्रारीही आहेत. कबुतरांनीही झाडांचा आश्रय सोडून खिडकीतल्या ग्रील्समध्ये बस्तान मांडलं. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींसह लहान मुलांनाही पटकन संसर्ग होतो.>फुफ्फुसाबाबत पुण्यात कार्यशाळाफुफ्फुसविकार आणि थोरॅसिक सर्जरी यासाठी आवश्यक ती सर्वोत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने व याबाबत डॉक्टर, नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पुण्यात ‘लंग डिसीजेस व फुफ्फुस विकार’ या विषयावर २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी होणा-या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ इंटरस्टिशिअल आयोजिण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे