शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात डेंग्यूचा वाढतोय प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:29 IST

पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ६९ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ६९ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सात वर्षांत २०१७ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. त्यावर्षी तब्बल ६ हजार ३९० रुग्ण डेंग्यूने बाधित झाले होते.साधारण जून ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्यूचा प्रादूर्भाव तुलनेने अधिक असल्याचा दिसून येत आहे. या वर्षी जानेवारी ते १५ जून या कालावधीत २५२ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी ६९ जूनच्या पंधरवड्यातील असून, ३५ रुग्ण तर या आठवड्यातच आढळले आहेत. शहरातील २५ रुग्णांना २०१२ ते २०१६ या कालावधीत आपले प्राण गमवाले लागले आहे.>डेंग्यू रूग्णांची आकडेवारीगेल्यावर्षी (२०१७) जून ते नोव्हेंबर या कालावधीत ६ हजार ३९० पैकी ६ हजार २७६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यात जून महिन्यात ५८, जुलै २२८, आॅगस्ट ७८६, सप्टेंबरमध्ये १ हजार ११४ आणि नोव्हेंबरमध्ये १ हजार ७९६ रुग्णांचा समावेश आहे. या वर्षी (२०१८) जानेवारीमध्ये ७९ रुग्ण आढळले आहेत.दूषित पाण्यामुळे होणाऱ्या डायरियाच्या संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. शहरात शहरात २०११ साली ८ हजार २१६, २०१२ साली ९ हजार ३८०, २०१३ मध्ये ७ हजार ८०४ रुग्णांची नोंद झाली.त्यात गेल्या तीन वर्षांपासून चांगली घट झाली असून, २०१५ मध्ये १ हजार ८४२, २०१६ मध्ये ७४३ आणि गेल्या वर्षी ५७५ रुग्णांची नोंद झाली. तर, १५ जूनअखेरीस डायरियाचे २१२ रुग्ण आढळून आले आहेत.