शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

नियोजनाच्या अभावामुळे वाढतोय बकालपणा

By admin | Updated: January 14, 2017 03:48 IST

जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी

पुणे : जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी, कचरा, असमान पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुरी स्वच्छतागृहे अशा विविध समस्या आहेत. तर पूरग्रस्त वसाहत असलेल्या दत्तवाडीमध्ये मालकी हक्क, बांधकामास परवानगी नसणे, नियोजनाच्या अभावामुळे वाढत चाललेला बकालपणा हे प्रश्न उभे आहेत. या प्रभागातील काही भाग सोसायट्यांचा असून, तिथे काही प्रमाणात कचऱ्याची समस्या जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.झोपडपट्टी, पूरग्रस्त वसाहत आणि सोसायट्या अशा तीन वेगवेगळ्या गटांतील नागरिक या प्रभागात आहेत. जनता वसाहत ही शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. हातावर पोट असलेले बहुतेक जण जनता वसाहतीत राहतात. घर बांधण्यापासून इतर सोयी-सुविधा देण्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे नियोजन या भागासाठी करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली कचरा, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, अपुरी स्वच्छतागृहे अशा समस्या आजही कायम आहेत. मुख्य रस्त्यालगत कालवा असून, त्याला सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आलेली नाही. अनेक जण कालव्यातच कचरा टाकताना दिसतात. यामध्ये सुधारणा करण्याची येथील नागरिकांची मागणी आहे.दत्तवाडीचा बहुतेक भाग या प्रभागात आला आहे. पूरग्रस्त वसाहतीमुळे दत्तवाडीच्या विकासात मर्यादा आहेत. अद्याप अनेकांना घरांचा मालकी हक्क मिळालेला नाही. या भागात नवीन बांधकाम करायचे म्हटले तरी मान्यता मिळत नाही. कुटुंब वाढत चालल्याने नागरिकांनी नाईलाजास्तव घरांचे मजले वाढविले आहेत. कचऱ्याची समस्याही या भागात आहे. दांडेकर पुलालगत असलेल्या झोपडपट्टीतही सुविधांचा अभाव आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या भागात अद्याप सर्व सुविधा नाहीत. अनधिकृत जाहिरातबाजीचा वेढाही या भागाला पडला आहे. सिंहगड रस्त्यालगत असलेल्या जगदेवनगर, सातववाडी, बाबूराव भाऊराव फुले उद्यान या परिसराचा काही भाग वगळल्यास बहुतेक सोसायट्या आहेत. पण असमान पाणीपुरवठा व कचऱ्याची समस्था जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावरील सातत्याच्या वाहतूककोंडीवरही या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)