शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवरील वाढते हल्ले चिंताजनक बाब  : शरद पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:40 IST

देशातील डॉक्टरांवरील होणारे हल्ल्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक : शरद पवार

ठळक मुद्देहल्ल्यांविरोधात सर्वांनी विचार करण्याची गरज असून कठोर कायदे करण्याची गरज

पाषाण : राज्यात व देशात डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून यात राज्यकर्ते व पोलीस यांच्यासह समाजातील सर्वांची जबाबदारी महत्वाची आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.बाणेर बालेवाडी मेडीकोज असोसिएशनच्या वतीने बाणेर येथे डॉक्टर दिनानिमित्त आयोजित वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या डॉ.नीरज आडकर,डॉ.शिरीष हिरेमठ,असोसिएशनसाठी महत्वपूर्ण कार्य करणारे डॉ.राजेश देशपांडे यांच्यासह गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे.एस.महाजन, संस्थापक डॉ.राजेश देशपांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, पालिकेचे डॉ. राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, पूर्वी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांवर हल्ले होत नसत. परंतु, अलीकडे याचे प्रमाण वाढत आहे. देशातील डॉक्टरांवरील होणारे हल्ल्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. याबाबत आपण सर्वांनी विचार करण्याची गरज असून याविरोधात कठोर कायदे करण्याची गरज आहे. अमेरिका किंवा इतर देशात उपचार करुन घेण्याचे आकर्षण आपल्याकडे जास्त असते.  तरीही आपल्याकडेच त्यांच्यापेक्षा चांगली रुग्णसेवा मिळते व त्या त्या क्षेत्रात काम करणा-या डॉक्टरांना असे रुग्ण हाताळण्याचा अनुभवही त्यांच्यापेक्षा जास्त असून हे मी स्वत: अनुभवले आहे. विविध गंभीर आजाराचे रुग्ण योग्य रीतीने हाताळण्याचे कौशल्य व अनुभव असलेले डॉक्टर आपल्या देशात किंबहुना आपल्या राज्यात असून याचा आपल्याला अभिमान आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हीच मंडळी आपल्याला विश्वास व दिलासा देऊन जीवनमान सुधारण्याचे कार्य करत असतात, असेही ते म्हणाले. यावेळी औंध,बाणेर ,बालेवाडी परिसरातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरSharad Pawarशरद पवार