शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

कोरोनानंतर स्वयंपाकघरात वाढला शक्तिदायक पदार्थांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

पुणे : लॉकडाऊनचा काळ हा खवय्यांसाठी जणू मेजवानीचा ठरला. स्वादिष्ट चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारणे हा जणू दिनक्रमच झाला ...

पुणे : लॉकडाऊनचा काळ हा खवय्यांसाठी जणू मेजवानीचा ठरला. स्वादिष्ट चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारणे हा जणू दिनक्रमच झाला होता. यातच कुटुंबातील सदस्यांच्या आग्रहानुसार वेगवेगळे पदार्थ बनवण्याकडे बहुतांश महिलांचा कल होता. मात्र, कुठल्याही आजाराचे मूळ कारण हे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे हेच असल्याने चमचमीत पदार्थांपेक्षाही पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त आहाराबाबत आता गृहिणी अधिक जागरूक झाल्या आहेत. त्यानुसार बहुतांश गृहिणींनी स्वयंपाकघरात बदल केले आहेत.

कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत आहारतज्ज्ञांचा देखील सल्ला घेतला जात आहे. डाळी, कडधान्य यांसह सूप, सॅलेडचा वापर जेवणात वाढतो आहे. शाकाहारी घरांमध्ये पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांना प्राधान्य मिळत आहे. रोज ताजी फळे, भाज्या आणण्यावरही अनेकांनी भर दिला आहे.

अन्नातील पोषक घटक सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासूनची बदलती जीवनशैली, फास्ट फूड आणि जंक फूडच्या अतिरिक्त वापरामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे. मैदानी खेळांचा अभाव त्यातच ‘शाळा बंद’मुळे देखील मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलांना एकाच ठिकाणी पाच ते सहा तास बसून राहावे लागते. त्यांच्यात स्थूलता वाढीस लागली आहे. कोरोनाने सर्वांनाच एक धोक्याचा इशारा दिला आहे.

यातच कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने गृहिणींनी कमालीचा धसका घेतला आहे. त्यामुळे निव्वळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात अधिकाधिक प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश होण्याची गरज गृहिणींनी ओळखली आहे. कुठल्या पदार्थातून अधिकाधिक व्हिटॅमिन किंवा पौष्टिक घटक मिळ्तील, दररोजचा आहार कसा असायला हवा, जेवणामध्ये कोणत्या गोष्टींचा अधिकाधिक समावेश असायला हवा याबाबत महिला अधिकाधिक जागरूक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.

चौकट

रोज कोशिंबीर, कडधान्ये आहारात

“कोरोनामुळे संपूर्ण जीवनशैलीतच आमूलाग्र बदल झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याशी कोरोनाचा संबंध आहे एवढे कळल्यानंतर मग ती वाढविण्यासाठी आमच्यासह अनेकांनी व्हिटॅमिन किंवा होमिओपॅथीच्या गोळ्या, काढे यावर भर दिला. पण, खरी रोगप्रतिकारशक्ती ही अन्नातून वाढू शकते हे उमगले. त्यानुसार आहारात जास्तीत जास्त प्रथिनेयुक्त घटक वापरले जात आहेत. रोज जेवणात वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर, किमान एका तरी कडधान्याचा वापर सुरू केला आहे.”

-अमृता देशपांडे, गृहिणी

चौकट

मिसळ-पावभाजीवर बंधन

“लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असल्याने प्रत्येकाच्या कधी पावभाजी, कधी मिसळ, कधी पिझ्झा अशा फर्माईशी व्हायच्या. मात्र, चमचमीत पदार्थांच्या सेवनामुळे ॲसिडीटी, पित्त या समस्या उदभवू लागल्या. तेव्हा ठरवलं की या पदार्थांपेक्षा सकस आहारावर भर द्यायला हवा आणि त्यानुसार स्वयंपाकघरात बदल केला.”

- वैशाली इनामदार, गृहिणी

चौकट

पोषक पदार्थांवर भर

“रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात अधिकाधिक वापर झाला पाहिजे. मुलांना उकडलेली अंडी देणे अधिक चांगले आहे. कडधान्ये, डाळी आणि सुकी फ‌ळे-बियांवर अधिक भर द्यायला हवा. मसालेदार पदार्थांमध्ये लवंगी, दालचिनी, मिरे किंवा जिरे पूड यांचा चिमूटभर तरी समावेश केला पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या मसाल्यांचा खूप उपयोग होतो. कोशिंबिरीमध्ये दालचिनीची पूड कुणी टाकत नाही. त्यात सहसा जिऱ्याची फोडणी देतात त्याऐवजी जिऱ्याची पूड टाकली तर अधिक उत्तम आहे. या मसाल्यांच्या पदार्थांची पूड करून ठेवावी आणि ती अदलून-बदलून वापरावी. गृहिणींनी स्वयंपाकघरात स्वत: काही प्रयोग करून पाहावेत.”

-आश्लेषा भागवत, आहारतज्ज्ञ

----