शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीत दरवर्षी ५ टक्केच वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:11 IST

महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य

पुणे : महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य शासनाने पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने दरवर्षी पाणीपट्टीमध्ये ५ टक्के वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या नगरविकास विभागामार्फत पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प राबविले जातात. नागरी संस्थांमार्फत या प्रकल्पांची कार्यवाही होत असताना त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी पाणीपट्टीमध्ये पाच टक्के वाढ करावी असे स्पष्ट केले आहे. योजनांचा प्राधान्यक्रम, भूसंपादन, स्वहिस्सा, अंमलबजावणीचा टप्पा, निविदा प्रक्रिया, स्रोतांचा विकास, जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था, प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.पुणे महापालिकेने यापूर्वीच पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शहराच्या पाणीपट्टीमध्ये पुढील वर्षासाठी १२ टक्के, तर त्यापुढील ४ वर्षे सलग १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे आणखी वाढ करायची आवश्यकता आहे का, याची चाचपणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.