दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात टोमॅटोची आवक स्थिर असल्यामुळे बाजारभावात वाढ झाली. मिरची, कोथिंबिरीची आवक कमी झाल्याने बाजार भावात वाढ झाली. वांगी, कार्ली, दोडका यांची आवक स्थिर असून बाजारभावही तेजीत निघाले.
त्याचप्रमाणो काकडी, भेंडी व भोपळा यांचे बाजारभावही स्थिर होते. फळभाज्या, पालेभाज्यांची आवक कमी झाली असून बाजारभाव तेजीत होते. दौंड तालुक्यात भुसार मालाच्या अवकेत वाढ झाली असन बाजारभाव तेजीत निघाले. नवीन बाजरीची आवक सुरु झाली असून बाजारभाव तेजीत आहेत. तसेच लिंबाची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत असल्याची माहिती सभापती महादेव यादव आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरित्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (10 किलोप्रमाणो) - टोमॅटो (43) 90-125, वांगी (21) 150-320, दोडका (13) 180 ते 300, भेंडी (18) 40 ते 80, कार्ली (5) 150 ते 300,
हिरवी मिरची (15) 300 ते 550, भोपळा (45) 35 ते 80, काकडी (35) 70 ते 200, कोथिंबीर (1020 जुडय़ा) 300 ते 950, मेथी (1020 जुडी) 350-700.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहु (एफ.ए.क्यु.) (257) 1500 ते 1800 ज्वारी (35) 2501 ते 3011, बाजरी (2) 1400 ते 1700, हरभरा (4) 2000 ते 2351, लिंबु (21) 350-950.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहु (एफ.ए.क्यु.) (891) 1550 ते 2100, ज्वारी (102) 2150 ते 3000, बाजरी (144) 1350 ते 2000, हरभरा (28) 2350 ते 3100, मका (66) 1101 ते 1350, लिंबु (160) 450-1125.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (161) 1400 ते 1700, ज्चारी (27) 1775 ते 2761, बाजरी (13) 1711 ते 1550, हरभरा (5) 2200 ते 2411, लिंबू (42) 500 ते 900. (वार्ताहर)