शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

अॅम्फोटेरोसीन-बीची निर्मिती वाढवावी, वितरणाची सोय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचे निदान होऊ लागले आहे. यालाच काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार असे म्हटले ...

पुणे : कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचे निदान होऊ लागले आहे. यालाच काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार असे म्हटले जात आहे. म्युकरमायकोसिसची उपचारपद्धती अत्यंत महागडी असते. यामध्ये अॅम्फोटेरोसीन-बी हे औषध वापरले जाते. या औषधाची निर्मिती वाढवावी आणि योग्य वितरण व्यवस्था लावावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शासनाकडे केली आहे.

हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, म्युकरमायकोसिसच्या उपचारात अॅम्फोटेरोसीन-बी या इंजेक्‍शनचा वापर केला जातो. त्याची ५० मिलिग्रॅमची एक व्हायल २५०० ते ३००० रुपयांना पडते. अंदाजे ७० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीला दिवसाला पाच ते सहा व्हायलची गरज भासते. याचा अर्थ इंजेक्शनचा दिवसाचा खर्च २० ते २५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही उपचार पद्धती पंधरा दिवसांपर्यंत चालते. म्हणजेच हा खर्च पाच लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. बुरशीचा संसर्गजन्य आजार मेंदूपर्यंत जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र ही उपचार पद्धती सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. त्यामुळेच शासनाने या इंजेक्शनचा दरावर नियंत्रण आणावे, वितरण व्यवस्थेला परवानगी द्यावी आणि निर्मिती वाढवण्याबाबत औषध कंपन्यांना सूचना द्याव्यात.

म्युकरमायकोसिससाठी पॉझोपोनेझॉल या गोळ्यांचाही वापर केला जातो. एका गोळीची किंमत सहा हजार रुपये इतकी आहे. किमान पन्नास हजार रुपये या औषधासाठी खर्च होतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

म्युकरमायकोसिसचे उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जातील, असे दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. मात्र ही योजना लागू असलेली राज्यात केवळ १००० रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या आजाराचा उपचार करणारे डॉक्टर आणि यंत्रणा उपलब्ध असेलच असे नाही. सर्व खाजगी दवाखान्यांना इंजेक्शन दिली जाईल, असेही जाहीर केले होते. ही सूचनाही लवकर अमलात यावी, अशी मागणी आयएमएतर्फे केली आहे.

----

कधी वापरले जाते अॅम्फोटेरोसीन-बी?

त्वचारोग, एखाद्या शस्त्रक्रियेतील गुंतागुंत, फुप्फुसांचा संसर्ग, फंगल न्यूमोनिया अशा वेळी फंगस अर्थात बुरशीचा शरीरात प्रादुर्भाव होऊ शकतो. या सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये अॅम्फोटेरोसीन-बी हे प्रभावी औषध मानले जाते. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी रेमडेसिविर हे पूर्णपणे प्रभावी ठरत नसले तरी लक्षणे कमी करण्यासाठी हे इंजेक्शन उपयुक्त असल्याचे लक्षात आल्याने मागणी अचानक वाढली आणि आणि तुटवडा निर्माण झाला. भविष्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास अॅम्फोटेरोसीन-बीचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि मनमानी दर आकारले जाऊ नयेत यासाठी शासनाने आत्तापासून दर नियंत्रित करावेत, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.