शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

उजनी धरणाच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 17, 2017 03:58 IST

जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत साठ्यात वाढ झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाकडून देण्यात आली. दोन दिवस असाच पाऊस राहिला तर धरणाची पातळी उणे पातळीतून अधिकवर जाईल, अशी शक्यता धरण व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली. पुणे, लोणावळा, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने अद्याप दडी मारलेली आहे. बंडगार्डन येथून २० हजार पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होत आहे. दौंड येथून २७ हजार क्युसेक्सवेगाने पाणी भीमा नदीपात्रात येत आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा वाढलो. दोन दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा वजा १६ टक्केपर्यंत होता. मात्र आजच्या आकडेवारीनुसार वजा १२.८३ पर्यंत पाणीसाठा वाढला आहे. दोन दिवस पावसाचा असाच जोर राहिला तर उजनीची पातळी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११७ टीएमसी आहे. उपयुक्त पातळी ५३ टीएमसी इतकी आहे. धरणातील आजची पाणीपातळी ४८९.९९० मीटर आहे.पुणे आणि दौंड भागातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप सुरक्षित पाण्यापासून वाचविण्यासाठी लगबग सुरु केल्याचे पाहावयास मिळत आहे.यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गतवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरणावर अवलंबून असणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला होता.लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगरावर भीमाशंकर, भोरगिरी, कळमोडी धरण परिसरात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाले, बंधारे, वाहून सखल भागात पाणी साचले आहे. रात्रभर पडलेल्या या पावसाने भीमा नदीच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाची पाणीपातळी वाढली असून, धरणात ६९.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून ४५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे भातलागवडीला वेग आला आहे.चासकमान धरणामध्ये मागील वर्षी याच तारखेला ५५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणी पातळी ६४३.३० होती. एकूण साठा १४५.३१ दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११८.१२ दलघमी होता.