शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सत्ताधाऱ्यांनो मानधन वाढवा अन्यथा खुर्च्या खाली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:11 IST

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा : शेकडो महिलांचा एल्गार, पंचायत समितीसमोर ठिय्या

बारामती / सांगवी : मतदारसंघात कधीच लक्ष न देणाºया आमदार खासदरांच्या वेतनात सासत्याने भरघोस वाढ होते शिवाय त्यांना निवास, भोजन, प्रवासासह अनेक सोयी पुरविल्या जातात मात्र देशाचे भविष्य घडविणाºया अंगणवाडी सेविकांना मात्र अतिशय तुटपंूंजे मानधन दिले जाते, त्याची सत्ताधाºयांनी लाज बाळगून आता तरी मानधन वाढवावे किंवा सत्ताधाºयांनी खुर्च्या खाली कराव्यात अशी मागणी शेकडोच्या संख्येने मोर्चामध्ये सामिल झालेल्या अंगणवाडी सेविकांनी केली.

शासनाच्या उदासिनतेच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी बुधवारी बारामती येथे मोर्चा काढण्यात आला. शारदा प्रांगणतून निघालेल्या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. शारदा प्रांगणहून भिगवण चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, स्टेशनरोड वरून दुपारी पंचायत समितीकडे मोर्चा वळविण्यात आला. पंचायत समितीच्या चौकामध्ये मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी अंगणवाडी शिक्षिका सेविका संघटनेच्या अनेकांनी भाषणे केली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याने शासनाच्या विरोधात आक्रोश करण्यात आल्या. वाढत्या महागाईच्या काळात सेविका मदतनीस यांना मिळणाºया अल्पवेतानातून संसाराचा गाडा चालवता येत नाही.आमची असणारी सध्य परिस्थिती शासनदरबारी विचारात घेतली जात नाही. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत मधून महिला व बालकल्याणचा १० टक्के निधीचा पुरेपूर वापर होत नाही. यासाठी अंगणवाडीत अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. यापुढे हक्काचा निधी अंगणवाडीसाठी खर्च करण्यात यावा. तसेच पर्यवेक्षिकांकडून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना होत असलेली दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांना देण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी साळवे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी दिपक नवले, अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षा आशा शेख, तालुकाध्यक्षा कल्पना जगताप, सुनील गावडे, अंगणवाडी सेविका मदतनीस आदी उपस्थित होते.आमच्या मागणीकडे कोणीच लक्ष देत नाही. सेविका मदतनीस जगली पाहिजे, महागाईच्या काळात शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्षित करत आहे. एवढ्या अल्पवेतनात विधवा, परितकत्या महिलांनी घर कसे चालवावे. या शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आता या महिलांना रस्त्यावर यावे लागत आहे.-कल्पना जगताप, अध्यक्षा, अंगणवाडी सेविका मदतनीससेविकांना १८ हजार तर मदतनीसांना १५ हजार द्या४अंगणवाडी सेविका यांना १८ हजार रुपए तर मदतनीस यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, १० तारखेच्या आत मानधन नियमित व्हावे, तीन वर्षांचे थकलेले टी. ए. डी. प्रथम काढण्यात यावी. आहारची बिले वाढवून नियमित मिळावी, टी. एच.आर. बंद करावा. अंगणवाडीत शिजवलेला ताजा आहार सहा ते तीन वर्षे लाभार्थी स्तनदा माता यांना देण्यात यावा. केंद्र सरकारने १ आॅक्टोबर २०१८ केलेली मानधन वाढ फरकासह त्वरित मिळावी, अतिरिक्त कामाचा बोजा सेविकेवर टाकू नये, पेन्शन योजना ज्या दिवशी कार्य मुक्त होतात त्याच दिवशी मिळाल्या पाहिजेत, सेविका मदतनिस रिक्तजागा त्वरित भराव्यात, सेविका मदतनिस यांना त्वरित नियमानुसार पदोन्नती द्यावी, अशा मागण्या आंदोलन दरम्यान केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती