शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

विजेअभावी कांदालागवड खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:42 IST

रब्बी हंगाम : नित्याचे आठ तास भारनियमन; त्यानंतरही लपंडाव

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामातील आर्थिक उत्पन्नाचा हुकमी एक्का अर्थात कांदालागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, लागवडीदरम्यान अधूनमधून वारंवार खंडित होणाऱ्या विजेअभावी कांदालागवडीची कामे खोळंबली आहेत. विजेचे झटके शेतकºयांना सहन करून लागवडीची कामे मार्गी लावावी लागत असल्याने लागवडीच्या काळात विद्युत महामंडळाने अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

चालू वर्षी पावसाळी हंगामातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत अल्प प्रमाणात वरुणराजाची कृपा झाल्याने पाण्याचे संकट निर्माण होऊ लागले होते. रब्बीतील कांदापीक शेतकºयांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. कांद्याच्या उत्पादनावर बळीराजाचे वार्षिक अर्थनियोजन अवलंबून असते. मात्र, यंदापावसाने दीर्घ काळ ओढ दिल्याने पाणीस्रोतांची पातळी खालावली आहे. परिणामी, कांदालागवडीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात परतीच्या मुसळधार वळवाच्या पावसाची कृपा होऊ लागल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या कांद्याची रोपे लागवडीसाठी परिपक्व होऊन लागवडीलायक झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर, यांत्रिक अवजारांच्या साह्याने शेतकरी जमिनींची मशागत करून ती लागवडयोग्य बनवून रब्बीची कामे हाती घेत आहेत. कांदालागवडीच्या कामांना मजुरांची टंचाई प्रकर्षाने जाणवत असून, लागवडीसाठी परगावाहून मजूर बोलवावे लागत आहेत. परिणामी, शेतकºयांना मजुरांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आर्थिक झळ सोसून सुरू असलेल्या लागवडीदरम्यान वीज गायब होत असल्याने मजुरांना बसवून ठेवण्याची वेळ आली आहे.कांदारोपे उपलब्ध...चालू वर्षीच्या रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या रोपांचा तुटवडा जाणवत नसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होऊ लागली आहे. खेड तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षीच्या रब्बी हंगामाच्या शेवटी-शेवटी कांद्याच्या बियाण्यांसाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गोठाची लागवड केली होती. हवामानाने साथ दिल्याने त्यापासून बियाण्यांचे उत्पादन मिळविण्यात शेतकºयांनाही यश मिळाल्याने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात रोपांची टाकणी झालेली आहे. परिणामी, कांदालागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यास अधिक मदत होत आहे.चासकमान धरणातील पाण्याचा फायदा...खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला नेहमीच चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याचा फायदा होतो. चालू वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने कृपा केल्याने चासकमान धरण १०० टक्के भरले आहे. जीवनदायिनी पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :Puneपुणे