शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:31 IST

वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांत ७१३ विनानोंदणी क्रमांकाच्या वाहनांवर आरटीओने केली कारवाईनोंदणी क्रमांक नसलेल्या सरासरी दरमहा ३० ते ४५ वाहनांवर कारवाई

विशाल शिर्के । पुणे : वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत ७१३ विनानोंदणी क्रमांकाच्या वाहनांवर आरटीओने कारवाई केली असून, त्यातील अवघ्या चार वाहन वितरकांवर कारवाईचे धाडस दाखविले आहे. कायमस्वरूपी वाहन नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कोणत्याही वाहन वितरकांना ग्राहकांना वाहन देता येत नाही. अनेकदा अशी वाहने रस्त्यावरुन सर्रास फिरताना आढळतात. अशा वाहनांचा वापर एखाद्या गुन्ह्यात झाल्यास त्याचा तपास लावणे जिकिरीचे होऊ शकते. तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनदेखील असे वाहन चालविणे चुकीचे आहे. अशा वाहनांचा अपघात झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनींकडून मिळत नाही. केंद्रीय मोटार वाहन नियमानुुसार असे वाहन चालविणे दंडनीय अपराध आहेत. विना क्रमांक दुचाकी चालविल्यास १ हजार, तर मोटार कार चालविल्यास २ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच वाहन वितरकाने नोंदणी क्रमांकाशिवाय वाहनाचे वितरण केल्यास त्यांच्यावरही परवाना निलंबानाची कारवाई करण्यात येते. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशी नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येते. सरासरी दरमहा ३० ते ४५ वाहनांवर कारवाई केली जात असल्याची नोंद आरटीओकडे झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ४०७ आणि जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ३०७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना आरटीओने केवळ वाहनचालकांवरच कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा वाहनांचे वितरण करणाऱ्या वाहन वितरकांवर औषधापुरतीदेखील कारवाई झाली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़.

नोंदणी क्रमांक नसणाऱ्या वाहनांवरील कारवाई २०१६    २०१७महिना           संख्या         महिना    संख्याएप्रिल           ७८            जानेवारी    ५६मे                 ४७            फेब्रुवारी     २७जून              ९३            मार्च           १९जुलै              ४५            एप्रिल        ३९आॅगस्ट        १२            मे              २५सप्टेंबर        ५३            जून            ३१आॅक्टोबर     ३२            जुलै            ४४नोव्हेंबर       २८             आॅगस्ट     ३८डिसेंबर         १९            सप्टेंबर      ३७

गेल्या दोन वर्षांत अवघ्या ४ वाहन वितरकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ही प्रकरणेदेखील जून २०१७ नंतरची आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी ही माहिती उघड केली आहे.  

टॅग्स :pune rtoपुणे आरटीओPuneपुणे