पुणे : विविध प्रकारच्या देशी-विदेशी वनस्पती व प्रजाती असलेल्या राईज एन शाईन बोटॅनिकल बुटिकचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते झाले. या समारंभाला डॉ. पी. डी. पाटील, सुनेत्रा पवार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे, राईज एन शाईनच्या भाग्यश्री पाटील उपस्थित होते. या बुटिकमध्ये विविध प्रकारच्या देशी-विदेशी वनस्पती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जगातील २७ देशांमध्ये विविध वनस्पतींची निर्यात केली जाते. कंपनीची १,०५,००० चौैरस फुटांची प्रयोगशाळा व ५००० चौैरस फूट जागेमध्ये संशोधन आणि विकास लॅब उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर राइज एन शाईनमध्ये टिश्यू कल्चर प्लँटेशनसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा असून यात प्रयोगशाळेचाही समावेश आहे.हेमामालिनी म्हणाल्या, ‘‘इकडील वनस्पती पाहिल्या, की मन प्रसन्न होते. ताण-तणाव दूर होतो. त्याचबरोबर या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.’’ उपक्रमाबद्दल बोलताना भाग्यश्री पाटील म्हणाल्या, ‘‘निसर्गातील सुंदरता लोकांना पाहता यावी, वेगवेगळ््या वनस्पतींची पुणेकरांना माहिती व्हावी, या संकल्पनेतून या बुटिकची निर्मिती करण्यात आली आहे.’’ (वा. प्र.)
राईज एन शाईन बुटिकचे हेमामालिनींच्या हस्ते उद्घाटन
By admin | Updated: February 13, 2017 02:18 IST