शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Narendra Modi in Pune Metro: पूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे; उद्घाटनाचा पत्ताच नसायचा! मोदीं कोणाला बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 07:00 IST

पंतप्रधान मोदी; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोतून सात मिनिटांची केली सफर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूर्वी प्रकल्पांचे केवळ भूमिपूजन व्हायचे; मात्र उद्घाटन कधी होणार, याचा पत्ता नसायचा. योजना वेळेत पूर्ण करता येतात, हे आज अधोरेखित झाले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस सरकारच्या काळातील प्रलंबित प्रकल्पांवर टीका केली. भारताच्या जगभरातील वाढत्या प्रभावामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी रविवारी येथे मेट्रोच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचे लोकार्पण केले. सिम्बायोसिस विद्यीपाठाच्या   सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात ‘सिम्बायोसिस आरोग्य धाम’चे उद्घाटन केले. 

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण मोदी यांच्या हस्ते झाले. गरवारे महाविद्यालय ते आनंद नगरपर्यंतचा सात मिनिटांचा प्रवास त्यांनी मेट्रोतून केला. एमआयटी कॉलेजच्या मैदानावर सभेत मोदी म्हणाले, आधुनिक सुविधांसाठी वेग व प्रमाण महत्त्वाचे असते. आपल्याकडे अनेक दशके महत्त्वाच्या योजना पूर्ण होण्यास विलंब व्हायचा. सरकारची उदासीनता, समन्वयाच्या अभावामुळे कामे प्रलंबित राहिली. कामे रखडली की त्यांचे महत्त्वही कमी होते. म्हणूनच ‘पीएम गतीशक्ती योजने’अंतर्गत कामांना वेग दिला.  कच्च्या तेलासाठी इतर देशांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. इथेनॉल, बायो-फ्युएलवर लक्ष केंद्रित केल्याने ऊस उत्पादकांना फायदा होईल.    गेल्या काही वर्षांतील भारताच्या जगभरातील वाढत्या प्रभावामुळेच युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत मायभूमीत परत आणणे सहज शक्य झाले. या उलट जगातील इतर मोठ्या राष्ट्रांना युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सोडवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

श्रीमंतांनीही लावून घ्यावी मेट्रोची सवयश्रीमंत, उच्चभ्रू असाल तरी सुजाण नागरिकांनी मेट्रोची सवय लावून घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मेट्रोमुळे प्रवास सोपा होईल, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होईल. २५ हजार टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखता येईल.शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असल्याने २०३०पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटींचा टप्पा पार करेल. शहरांमध्ये उड्डाणपुलांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त वाढवता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाच एकमेव सशक्त पर्याय आहे, असे ते म्हणाले.

५ तास १० मिनिटे पंतप्रधान पुण्यात होतेसकाळी १०.२५ : दिल्लीहून खास विमानाने लोहगाव येथे आगमन१०.४५ : हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालय मैदानावर आगमन११.०५ : मोटारीने पुणे महापालिकेत आगमन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नगरसेवकांची भेट११.३० : पालिकेतून मोटारीने गरवारे महाविद्यालय स्टेशनवर. कोनशिलेचे अनावरण करून मेट्रो प्रकल्पाची पाहणी. स्वत: तिकीट काढून मेट्रो स्टेशनवर गेले. हिरवा झेंडा दाखवून मेट्रोत बसले. दुपारी १२.०० : एमआयटी कॉलेज येथे जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचले. विविध विकासकामांची उद्घाटने केली. १.५२ :  मोटारीने कृषी महाविद्यालयात आले. तेथून हेलिकॉप्टरने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठात पोहोचले. ३.३५ : हेलिकॉप्टरने लोहगाव विमानतळावर पोहोचले. तेथून दिल्लीकडे रवाना झाले.

पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय ते वनाज या ५ कि. मी. व पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या ७ कि. मी. मार्गाचे उद्घाटन झाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी