शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी युवकांचा हातात कोयते घेत दहशत पसरविण्याचा प्रयत्न; हॉटेल आणि दुचाकींची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 21:53 IST

बारामती शहरातील महाविद्यालय परीसरात  चार ते पाच  मद्यपी युवकांनी दुचाकीवर येत हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

बारामती (प्रतिनिधी): बारामती शहरातील महाविद्यालय परीसरात  चार ते पाच  मद्यपी युवकांनी दुचाकीवर येत हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.शहरातील चार  पाच  हॉटेल आणि दुचाकी या युवकांनी फोडल्या. त्यामुळे शहराच्या त्या भागात दहशत पसरल्याचे चित्र होते .शनिवारी(दि १७) सायंकाळी हा प्रकार घडला. सायंकाळी घडला.यामध्ये काही दुचाकींचे नुकसान झाले आहे.तर दोघेजण मद्यपी युवकांच्या हल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक महाडीक म्हणाले,नशेतील  युवकांनी हा प्रकार केला  आहे.यापैकी एकजण अल्पवयीन आहे.तालुका पोलीसांनी सबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे.तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परीसरासह ,सराफ पेट्रोल पंप आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी फोडण्याचा प्रकार घडला आहे.दारुच्या नशेत हा प्रकार  केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .

संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजिक एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली, तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणा-या कर्मचा-यावर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकविल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याचे समजते.

त्या नंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये हे युवक घुसले.तेथे  भांडणे करीत या युवकांनी हॉटेल आणि दुचाकीआणि चारचाकी वाहनांची  मोडतोड केली. चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर कोयत्याने वार केल्याचं समजते .  त्या नंतर दुचाकीवरुन हातात कोयते घेऊन या युवकांनी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही दुकानांच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पुढे येत आहे .

पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले  आहे. संबंधित घटनास्थळी जात पोलीस माहिती घेत आहेत . आरोपींची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारी