शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयाचा कारभार सुधारा, चाकणच्या नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 20:04 IST

मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच , सुविधांचा आभाव

हनुमंत देवकरचाकण : मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच , सुविधांचा आभाव , कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा ,अधिकाऱ्यांची अनास्था, यामुळे चाकण च्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम लवकर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून पुरेशे मनुष्यबळ भरून पोष्टाचा कारभार सुधारण्याची  मागणी चाकण परिसरातील नागरिकांकडून होत आहे . औद्योगिक वसाहत, छोटे, मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्या वस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह, या भागातील सर्व बँका ,पतसंस्था यांचा कारभार  तसेच दैनंदिन टपाल, ठेव योजना, बचत योजना, विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. नागरिकांना ताटकळत खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कामास विलंब होतो अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची खंत आहे. शहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहे; मात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत. चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी तीन अधिकारी व हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आठ-दहा कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत. मोबाइलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी शासकीय पत्रे, कंपन्यांची टपाल , फोन, मोबाईलची बिले, विमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत. त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत.