शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा भार, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार पुढील वर्षीपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:51 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी वाढीव शुल्काची आकारणी करता येईल. परिणामी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर वाढीव शुल्काचा भार पडणार नाही.नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठात शुल्क निर्धारण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने मंजूर केलेल्या आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता मिळाल्यावर महाविद्यालयांना वाढीव शुल्क घेता येणार आहे. त्यातच महाविद्यालयांकडून केल्या जाणाºया खर्चानुसार विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करता येईल, अशीही तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे. जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या शुल्क निर्धारण समितीची बैठक मंगळवारी विद्यापीठात घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार, उपकुलसचिव विकास पाटील, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अहमदनगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, २०१२ पासून विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमाच्या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. शुल्कवाढ न केल्याने महाविद्यालयांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.महाविद्यालयातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्याबरोबरच प्राध्यापकांच्या वेतनावर होणारा खर्च शिक्षणसंस्थांच्या क्षमतेच्या बाहेर जाऊ लागला आहे. परिणामी विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीकडून शुल्क निश्चिती करून घ्यावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात होती. त्यामुळे विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीने शुल्कवाढीची प्रक्रिया सुरू केली आहे.>अभ्यासक्रमाबाबत चर्चासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीच्या बैठकीत मंगळवारी विद्यापीठातील विविध विभागांमधील अभ्यासक्रमांचा व संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. एकूण किती अभ्यासक्रम शिकवलेजातात व त्यासाठी किती शुल्क आकारले जाते याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. कायद्यानुसारविद्यार्थ्यांना वाढीव शुल्कवाढीची सहा महिने आधी कल्पना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षी शुल्कवाढ होणार नाही.- डॉ. आर. एस. माळी,माजी कुलगुरू,जळगाव विद्यापीठ>कला, वाणिज्य, विज्ञानमध्ये शुल्कवाढविद्यापीठाशी संलग्न शासकीय व स्वायत्त महाविद्यालय वगळता सर्व महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य, विज्ञान आदी विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ होणार आहे.प्रथमत: सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून किती शुल्क आकारता येईल; याबाबतचा निर्णय विद्यापीठाच्या समितीकडून जाहीर केला जाईल.मात्र, एखाद्या महाविद्यालयास शुल्क निर्धारण समितीने केलेली शुल्कवाढ अमान्य असेल तर समितीकडे याबाबत दाद मागता येईल. तसेच महाविद्यालयाकडून केला जाणारा खर्च दाखवून वाढीव शुल्क घेण्यास परवानगी मागता येईल.

टॅग्स :Puneपुणे