शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीचा परिणाम : हौद व टाकीतील विसर्जनाला वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:21 IST

नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे.

पुणे - नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या वर्षी नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५ मूर्तींचे विसर्जन झाले, तर हौद व टाक्यांमध्ये तब्बल ३ लाख १८ हजार ४६४ मूर्ती विसर्जित झाल्या. एकूण ६७६ टन निर्माल्य जमा झाले.शहरात सहा लाखांपेक्षा अधिक मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना होत असते. मूर्ती विसर्जन करण्यासाठी हौदांची व्यवस्था महापालिका करते. शहरातील १८ घाटांवर, तसेच २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ६५५ पेक्षा अधिक निर्माल्य कलश, तसेच १ हजार ३५९ कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले होते. ५ लाख २७ हजार ३१९ गणेश मूर्तींचे यावर्षी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्यातील घाटांवर ५५ हजार ६९० मूर्ती विसर्जित झाल्या. हौदात १ लाख १९ हजार ७२ व टाक्यांमध्ये १ लाख १९ हजार ३९२ मूर्तींचे विसर्जन झाले. नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५, तर कॅनॉलमध्ये १ लाख ९ हजार ८७३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तलाव व विहिरींमध्ये अनुक्रमे ११ हजार ४३० व २ हजार ९८१ मूर्तींचे विसर्जन झाले. एका प्रायोजकाने दिलेल्या हौदांमध्ये ५ हजार ९३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनाची सर्व ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुरक्षित करण्यात आली होती. नदीपात्राच्या ठिकाणी एकूण २ हजार ४०१ जीवरक्षक नियुक्त होते. स्वच्छता कर्मचाºयांचीही स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेचे एकूण ९ हजार कर्मचारी स्वच्छतेपासून ते मंडळांच्या स्वागत कक्षापर्यंत राबत होते. पोलीस तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेतील या कर्मचाºयांनीही जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन