शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अवैध सावकारी धंदे जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:22 IST

अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून,२०१४ मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत.

आंबेठाण : अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून,२०१४ मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. अशा लोकांच्या पोलिसांबरोबर असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, त्यामुळे अवैध सावकारी छुप्या पद्धतीने चाकण परिसरात जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.नुकतेच एक प्रकरण खेड तालुक्यातील चाकण या शहरात उघडकीस आले आहे, विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक विद्यमान नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खासगी सावकरीचे छुपे धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. चाकण पंचक्रोशीत वाढत्या औद्योगिकीकरणाने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, जमिनीतून करोडो रुपये आल्याने अनेकांनी छुप्या पद्धतीने अवैध सावकारी सुरू करून, परिसरातील परप्रांतीयांसह राज्याच्या इतर जिल्ह्यांतील अनेक लोकांना काही ठराविक रकमा देऊन, व्याजाचा धंदा सुरू केला आहे. अवैध सावकारीचा धंदा करणाºयांनी गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी सावकार ३ ते १० टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे, काही जण तर चक्क २० ते ४० टक्के व्याजानेही पैसे देत आहेत, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारीचा धंदा करणाºयांकडून पैसे घेत आहेत. अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते, चाकण परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले, तर अनेक जण कुटुंबाला वाºयावर सोडून परागंदा झाले असल्याच्या घटना ताज्या आहेत.अवैध सावकारीचा धंदा करणाºया काहींनी व्याजापोटी अगोदरच कोºया चेकवर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेत असतात, जर व्याजाची रक्कम थकल्यास सावकाराकडून शिवीगाळ तर केली जातेच. शिवाय, संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. पंरतु अनेक जण भीतीपोटी पोलिसात तक्रार देण्याचे धाडस दाखवत नाहीत. शिवाय अवैध सावकारी करणारे घरी जाऊन जमिनी व घरे नावावर करून देण्याची धमकी देत आहेत.मागील काही वर्षांमध्ये या भागात अवैध सावकारीचे पैसे परत करता येऊ शकत नसल्याने अनेक जण कायमचे फरार झाले आहेत, अनेकांनी व्यवसायासाठी व्याजाने लाखो रुपये घेतले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.यामधील बहुतेक जणांनी मुद्दल व व्याज देऊनही खासगी अवैध सावकरांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात घेणे, जमीन लिहून घेणे अशा घटना घडत आहेत किंवा अशा धमक्या दिल्याने कर्जदार नातेवाईक व मित्रमंडळींकडून पैसे गोळा करून, सावकाराला परत द्यावे लागत आहेत. एकंदरीतच सावकार झोकात आणि कर्जदार कोमात अशी काहीशी स्थिती चाकण परिसरात आहे.> चाकण परिसरात सहा जण अवैध पद्धतीने सावकारीचा धंदा करत असल्याचे समोर आले आहे. त्या लोकांवर सावकारीचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी छुप्या पद्धतीने व्याजाने पैसे घेतले असतील आणि मुद्दल देऊनही, संबंधित सावकार पैसे उकळण्यासाठी दमबाजी किंवा दादागिरी करत असतील, तर त्या लोकांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल करावी, आमच्याकडून तक्रारदाराला संरक्षण दिले जाईल. अवैध पद्धतीने सावकारी करणाºयांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. - मनोजकुमार यादव,पोलीस निरीक्षक,चाकण पोलीस ठाणे.