शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गुटखा सुरू आहे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:02 IST

फोफावतोय बेकायदा व्यवसाय : पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर

नीरा : राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करून तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते तसेच महामार्गाच्या कडेला असलेल्या पानाच्या दुकानांमधून (टपऱ्या) तसेच किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा तसेच ओला मावा विकला जात आहे. ग्रामीण पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर या व्यावसायिकांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे.

गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटखाविक्री तसेच उत्पादन व वाहतूक यांवर निर्बंध लादले. कायदा न मोडता तो पद्धतशीरपणे वाकविण्याची वृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू आशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध व्यावसायिकांनी तयार करीत अशा उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली आहे.शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानांतून गुटखाविक्री सुरू आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा याला कारणीभूत असल्याचे मत अनेक पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पानपट्टी किंवा दुकान वजा घराचा आसरा घेऊन मोठ्या गावांमध्ये गुटखाविक्री होत आहे. सध्या तर हॉटेल, किराणा दुकानांतही खुलेआम गुटखाविक्रीने स्वरूप धारण केले आहे. दूधविक्रेतेदेखील गुटखाविक्री करतानाचे चित्र दिसून येत आहे. लहान मुले व तरुण याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते. काही पानटपरीधारक तंबाखू, सुगंधी सुपारी व इतर घातक रसायनांचे मिश्रण करून ओला मावा प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून विकत आहेत.गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्तयवत : सहजपूर (ता. दौंड) गावाच्या हद्दीत यवत पोलिसांनी संशयित टेम्पो पकडून त्यातील हातभट्टीची गावठी दारू जप्त केली आहे.यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी पोलीस पथक बुधवारी सकाळी रवाना केले होते. पोलीस नाईक दीपक पालखे, पोलीस हवालदार वाघ व पोलीस शिपाई उत्तप्पा संकुल यांना त्यांनी संबंधित ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस पथकाने सहजपुर येथे संशयित रित्या वाहतूक करणारा टेम्पो (एमएच ४२, एम ८०८६) तपासला. यावेळी टेम्पो मध्ये २४५ लिटर तयार गावठी दारू अंदाजे किंमत २४ हजार ५०० रुपये मिळून आले. पोलिसांनी टेम्पो सह गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी जया अमित गुडदावत (रा. गाडामोडी, खामगाव, ता. दौंड), टेंम्पोचालक दत्ता गणपत पंडित (रा. गाडामोडी, ता. दौंड) व माल विकत घेणार सोमा लोंढे (रा. हडपसर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी उत्तप्पा यल्लाप्पा संकुल यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक दिपक पालखे हे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे