शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

किचकट प्रक्रियेमुळे विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 6, 2014 00:32 IST

शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते.

सुवर्णा नवले, पिंपरीशहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते. यामुळे नागरिक विवाह नोंदणीला धजावत नाहीत. शहरातील नागरिकांचे असे मत आहे की, विवाह नोंदणीसाठी कागदपत्रे मोठया प्रमाणात जमा करावे लागतात. विवाह नोंदणी विभागातून अथवा नागरी सुविधा केंद्रातून विवाह संबंधी कागदपत्राची मोठी यादी मिळते. नागरिकांकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यांना अर्धवट माहिती यासंदर्भात असते.विवाह नोंदणी संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रांमध्ये नागरिकांना शहरातील वधू किंवा वर रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे़ तसेच विवाह नोंदणी अर्जावर वधू व वर यांचे साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फ ोटो लागतात. नोंदणीसाठी १०० रूपये किंमतीचा कोर्ट फी स्टँप विवाह नोंदणीसाठी लागतो. वधू व वर यांच्या जन्म तारखेचा पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला, हे उपलब्ध नसल्यास नोंदणी धारकांचा वाहनपरवाना अथवा पासपोर्ट लागतो. विवाह नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका लागते ती नसल्यास विवाहाचा फ ोटो लागतो. वर व वधू घटस्फोटीत असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची प्रत लागते. विवाह झाल्याचा कार्यालयाचा दाखला तसेच विवाह लावलेल्या भटजीची स्वाक्षरी लागते. या सर्व कागदपत्रामुळे नागरिक विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष करतात. विवाह नोंदणीसाठी १५ दिवसाच्या आत कागदपत्रांची तपासणी करून विवाह प्रमाणपत्र दिले जाते. असे विवाह अधिनियाममध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा १९९८ कलम ५ व ६ प्रमाणे हा अधिनियम आहे. १५ दिवसाचा एकूण विवाह नोंदणी कालावधी आहे. मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतरही नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. विवाह नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नागरिक महत्त्वाची गरज भासल्यास विवाह नोंदणीकडे वळतात. तेव्हा लगेच नोंदणी होत नाही.