शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

धरण, कालव्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: March 25, 2015 00:31 IST

पवना आणि नागपूरमधील धरणांत रविवारी एकूण ११ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण आणि शहरातून जाणाऱ्या कालव्याचा आढावा घेतला

पुणे : पवना आणि नागपूरमधील धरणांत रविवारी एकूण ११ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण आणि शहरातून जाणाऱ्या कालव्याचा आढावा घेतला असता निराशाच हाती आली आहे. धरण आणि कालवा परिसरामध्ये पवना आणि नागपूरप्रमाणे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांकडे संबंधित यंत्रणेचे लक्षच नसल्याचे निदर्शनास आले. रविवारच्या दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने सोमवारी आणि मंगळवारी खडकवासला धरण आणि कालव्याची पाहणी केली. खडकवासला येथील अपुरी सुरक्षाव्यवस्था पाहता पवना वा नागपूर प्रकरणाची पुनरावृत्ती आपल्याकडेही घडल्यास नवल वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. पोहता येत असो वा नसो अनेक मुले, मुली, युवक कालव्यामध्ये बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद लुटत होते. एखादी व्यक्ती बुडाल्यास या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था असल्याचे आढळले नाही.सिंहगड रस्ता परिसरातील जनता वसाहतीतून गेलेल्या कालव्याची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. जनता वसाहतीतून कालव्याच्या मार्गाने पुढे गेल्यावरही हेच चित्र दिसले. कालव्यात पोहणारी मुले, मुली, युवक तसेच आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांसोबत संवाद साधला असता बहुतेकांना पवना आणि नागपूरमधील दुर्घटनेची माहिती नव्हती. असे घडल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर ‘आपल्याला काय त्याचे?’ पद्धतीचे भाव होते.अनेक ठिकाणी कालव्याची भिंत तुटलेली होती. यातील काही ठिकाणी परिसरातील लोकांनी टाकलेला कचरा आणि घाण साचलेली होती. साहजिकच ही घाण पाण्यात मिसळत होती आणि तेथेही लहान मुले-मुली सूर मारण्याचा खेळ करीत होती. कालव्याची भिंत तुटलेल्या काही ठिकाणी पाण्याने जवळची जमीन पोखरली बाहे. यामुळे तेथील रस्ता धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो गाडीसकट कालव्यात पडण्याचा धोका आहे. कालव्याजवळील वसाहतीतील महिला पाण्यात उतरून कपडे धुतात. त्याचवेळी त्यांची लहान मुले धोकादायकपणे पाण्यात खेळत असतात.युवकांसोबत अगदी ७-८ वर्षांची मुलेदेखील कालव्यावरील पुलांच्या कठड्यावर उभी राहून १५ ते २० फूट उंचीवरून खोल पाण्यात उड्या मारत होती. सर्वांसमोर हा जीवघेणा खेळ सुरू असताना कुणीही त्यांना हटकले नाही. या मुलांना विचारले असता ती म्हणाली, ‘‘हा खेळ तर आम्ही नेहमीच खेळतो. काहींना पोहता येत नाही. त्यांना बाकीचे पोहणारे सांभाळून घेतात. पोहता न येणाऱ्याने उडी मारल्यानंतर तो बुडायला लागतो. आम्ही गंमत म्हणून थोडा वेळ त्याला गटांगळ्या खाऊ देतो आणि नंतर बाहेर काढतो. अशाच पद्धतीने नंतर ही मुले पोहणे शिकतात.’’ मंगळवारी गोळीबार मैदानाजवळ धोबीघाट परिसरात एका २० वर्षीय युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. लहान मुलांच्याबाबतीत अशा घटना घडणे सहज शक्य आहे. (प्रतिनिधी)सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष४खडकवासला धरण परिसरात सुरक्षारक्षक केवळ नावालाच होते. ते बराच वेळ धरणाच्या एका बाजूला घोळक्याने उभे होते. एक महिला आपल्या ६-७ वर्षांच्या मुलाचे पोहतानाचे फोटो काढत होती. युवक, युवतींचे अनेक ग्रुप, प्रेमी युगुल पाण्यात उतरून मजा लुटत होते, मोबाईल-कॅमेऱ्यामध्ये फोटो काढत होते. यापैकी कुणालाही सुरक्षा रक्षकांनी हटकले नाही. सुरक्षिततेसाठी बांधलेली भिंत अनेक ठिकाणी पडली (की पाडली?) आहे. त्याचा उपयोग धरणाच्या पाण्यात उतरण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.