शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात यावेच लागेल : शाह फैजल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 15:05 IST

आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी  शाह फैजल यांनी व्यक्त केले 

पुणे :  शाह फैजल तरुणांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे, असे तेथील स्टेक होल्डर्सना वाटत आहे. कारण, लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच तेथे अनेक गैरसमज आहेत. आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी  शाह फैजल यांनी व्यक्त केले 

                  सरहद आणि अर्हम फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. पुढे ते  म्हणाले की, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये काश्मीरमधील परिस्थिती खूप बिघडली आहे. तरुण द्वेषापोटी हातात बंदूक घेत आहेत. १०० हल्लेखोर मारले गेले, तर २०० नव्याने तयार होतात. गोळीचे उत्तर गोळीने देऊन चालणार नाही. अजून किती सैनिक आणि तरुण मारले जाणार आहेत? आपले वैधानिक अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. तरुणांचा राजकारण्यांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वैधानिक अधिकारच नाहीत, तर मतदान का करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणांना त्यांना अधिकार मिळायला हवेत. शासन, प्रशासन आणि सामान्यांमध्ये संवादाचे पूल बांधले जावेत             याशिवाय ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांशिवाय जम्मू-काश्मीरची संस्कृती अपूर्ण आहे. तेथील मुलांना मूळ संस्कृतीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळेच काश्मीरची मूळ ओळख कायम ठेवायची असेल तर शांतता प्रस्थापित करुन काश्मीरी पंडितांनापरत बोलावले पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यातूनच भावी पिढी विविधतेतून एकता शिकू शकेल.देश, सरकार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकार बरोबर किंवा चूक असू शकते. त्यावर टीका होऊ शकते. मात्र, सरकार आणि देश एकच असे गेल्या काही वर्षांपासून बिंबवले जात आहे. सरकारच्या विरोधात बोलले की देशद्रोही ठरवले जाते.

महात्मा गांधी सर्वमान्यमहात्मा गांधींना केवळ भारतातच नाही, जगात मानले जाते. अनेक ठिकाणी त्यांच्यावर संशोधन सुरु आहे. अनेक परदेशी तरुण त्यांची तत्वे अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीर सध्या जळत आहे. काश्मीरमधील अशांततेतून शांततेकडे घेऊन जाणारा मार्ग गांधींच्या अहिंसक विचारांमध्येच मिळू शकतो.

टॅग्स :PoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीरFaisal Khanफैजल खान