शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'...तर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्मयोगीची निवडणूक लढवणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 11:55 IST

सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगले उमेदवार व  कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्यांच्या शोधात आहे. जर असे सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रागृह येथे बुधवार ( दि. २२ )  सप्टेंबर  रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे माहिती देताना जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणाले की, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. ऊसाची पेमेंट अद्यापी नाहीत, वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतुक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय ही भावना नुसत्या सभासदांची नाहीतर, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आहे. कामगार सुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र त्या कारखान्यात मोठी गंमत आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी यासाठी काही नियम केले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.