शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

...हा प्रश्न मार्गी न लावल्यास पुणेकर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:14 IST

सांगा आम्ही कसं जगायचं? जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.त्याची डागडुजी किंवा दुरूस्ती करू शकत नाही....ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत आहे. ‘घर का ना घाटका’ अशी  आमची अवस्था झाली आहे.

नम्रता फडणीस

पुणे : सांगा आम्ही कसं जगायचं? जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.त्याची डागडुजी किंवा दुरूस्ती करू शकत नाही....ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत आहे. ‘घर का ना घाटका’ अशी  आमची अवस्था झाली आहे. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर या ऐतिहासिक वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात बांधकाम करण्यास प्रतिबंध केला आहे. पण आमचे वाडे गल्लीबोळात आहेत.  त्याचे बांधकाम केले तर जागतिक वारसा असलेल्या वास्तूंना काय धक्का पोहोचणार आहे? आसपास अनेक बांधकाम झाली आहेत पण आम्हाला जुन्या वाड्यांच्या दुरूस्तीची परवानगी नाही? हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न धसास न लावल्यास  येत्या निवडणुकीत नोटाचा वापर किंवा निवडणुकीवरच  बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.              शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1992 साली शनिवारवाडा, पाताळेश्वर  आणि आगाखान पॅलेसच्या  शंभर मीटर परिसरात बांधकाम करता येणार नाही. याविरूद्ध लोकांना कोर्टात दाद मागता येणार नाही असा अध्यादेश काढला.  त्यात 2008 मध्ये दुरूस्ती करून 200 मीटर परिसरात बांधकामाला परवानगी दिली मात्र पण उंचीची मर्यादा घातली आहे. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस  हा तिन्ही भाग मिळून 120 एकर जागा आहे. त्यातील 22 एकर जागा प्रतिबंधित असून, 98 एकर जागेत प्रवेश करण्यास मनाई आहे.  शनिवारवाडा हा  कसबा, बुधवार आणि शनिवार पेठेच्या मध्यवर्ती भागात आहे. याठिकाणी शंभर ते दीडशे वर्षांपूर्वींचे 38 जुने वाडे असून, जवळपास 10 हजार लोक या भागात वास्तव्यास आहेत. हे जुने वाडे आज कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मात्र त्याची दुरूस्ती करण्याची बाधित नागरिकांना परवानगी नाही.

             स्वत:च्याच घरात परक्यासारखे राहाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडूनआश्वासन दिली जातात. आम्हीच नगरसेवक, आमदार आणि पालकमंत्री निवडून दिले. मात्र आमच्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या विरूद्ध आता नागरिकांनी एल्गार पुकारला असून, लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गी न लावल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारण्याचा निर्णय घेतला आहे

टॅग्स :historyइतिहासElectionनिवडणूक