शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द झाल्यास सीईटी घ्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या ...

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांवर अवलंबून नसले तरी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचाच विचार केला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यास प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमी सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आणि राज्य शासनानेसुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षासुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु, या परीक्षा रद्द झाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना बारावीतील विविध विषयांमधील संबंधित घटकाचे ज्ञान झाले किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी घरी राहून विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे मागविण्याचा विचार करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षा घेतल्या जातात. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, वाडिया महाविद्यालय साधी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे चढाओढ असते. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेश याप्रमाणेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा सीईटी परीक्षा द्यावी लागेल, असेही प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

----------------

कोरोनामुळे परीक्षा रद्दचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांना काही प्रश्नांची उत्तरे घरी बसूनच लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला संबंधित विषय समजला आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. पुढील शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्याला पायाभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठीच परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेज

------------

विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जातात. परंतु, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य शासन किंवा विद्यापीठांना अभ्यासक्रम आणि प्रमाणेच प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड