शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक वाचनातून मी बोललो, वारकरी संप्रदायाची माफी मागतो; धीरेंद्र शास्त्री यांचा माफीनामा

By विश्वास मोरे | Updated: November 22, 2023 22:59 IST

देहूत संत तुकोबा चरणी नतमस्तक

विश्वास मोरे 

देहूगाव : माझ्याकडे आलेल्या पुस्तकाच्या वाचनातून मी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोललो, त्यांच्यामुळे वारकरी संप्रदाय भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी वारकरी संप्रदायाची माफी मागतो, अशी भावना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देहूत बुधवारी व्यक्त केली. देहूत संत तुकोबा चरणी नतमस्तक होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याविषयी बागेश्वर शास्त्री महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते.  शास्त्री महाराज पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना संत तुकाराम महाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी घेतला होता. समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून त्यापुढे असली बेजबाबदार वक्तव्य बंद करावित, नाहीतर नाठाळाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा निर्वाणीचा इशारा देहूकर महाराज यांनी दिला होता. तसेच सध्या पुण्यात सुरू असलेल्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांसह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भेट दिली. श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. वादावर पडदा टाकला.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मी एका पुस्तकात लेख वाचला होता. त्यामुळे बोललो, माझा तसा उद्देश नव्हता. मी समजू शकलो नाही. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी महाराष्ट्राची संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे अद्भुत कार्य हे आपणास प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन मोठे समाधान झाले.  श्री संत तुकाराम महाराजांनी तपाच्या बळावर बुडवलेली गाथा इंद्रायणी नदीवर तारल्या. त्याही न भिजता, अशी भारतातील संतांची परंपरा आहे. म्हणून मी तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी आलो आलो. संतांचा आशीर्वाद लाभल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम