शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आवाज वाढवू नको डीजे, तुला बाप्पाची शपथ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:02 IST

गणपती बाप्पाला मंगळवारी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मनोभावे निरोप दिला जाणार आहे. अलीकडच्या काळात कर्णकर्कश डीजे लावून त्यासमोर नाचण्याचे नवीनच फॅड आले आहे.

पुणे : गणपती बाप्पाला मंगळवारी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मनोभावे निरोप दिला जाणार आहे. अलीकडच्या काळात कर्णकर्कश डीजे लावून त्यासमोर नाचण्याचे नवीनच फॅड आले आहे. मात्र मिरवणूक संपल्यानंतर कानाला सूज येणे, कान फुटणे, बहिरेपणा जाणवणे अशा तक्रारी घेऊन असंख्य रुग्ण डॉक्टरांकडे येतात. या पार्श्वभूमीवर डीजेचा आवाज मर्यादित ठेवून होणाºया संभाव्य त्रासापासून दूर राहावे. जर एखाद्या ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे सुरू असेल तर तेथून दूर जावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक मंगळवारी निघणार आहे. पूर्वी विसर्जन मिरवणुकीमध्ये बाजा, ढोल, लेझीम आदी पारंपरिक वाद्यांचा गजर केला जात होता. मात्र मागील काही वर्षांपासून डीजेसारखी प्रचंड मोठा आवाज करणारे वाद्ये मिरवणुकीत आणली जात आहे. या डीजेसमोर मद्य सेवन करून धांगडधिंगा घालण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मात्र डीजेच्या आवाजाचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. त्याच्या आवाजाने गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, आजारी स्त्री-पुरुष यांना अतोनात त्रास होतो. ढोलताशांचा दणदणाट, टोलचा ठोका, हृदयाचा ठोका चुकविणाºया डीजेचा गगनभेदी आवाज याच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास तुमच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते़ प्रसंगी अचानक ऐकू येणे बंद होण्याची शक्यता असल्याचा इशारा कान-नाक-घसा तज्ज्ञांनी दिला आहे़तज्ज्ञांच्या मते स्पीकर, ढोलताशांच्या सान्निध्यात बराच वेळ राहिल्यास लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते़ गर्भवती महिलांच्या विशेषत: त्यांच्या गर्भातील बाळावर या मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो़ बराच वेळ असा मोठा आवाज कानावर पडल्यास गर्भपाताची शक्यताही नाकारता येत नाही़ जास्त वेळ स्पीकरचा विशेषत: डीजेचा आवाज कानावर पडत राहिल्यास कानाच्या नसा कमजोर होऊ शकतात़ अशा आवाजात लोक मोठ्याने बोलतात, त्याचा परिणाम होऊन रक्तदाब वाढू शकतो़ त्यातून मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते़मिरवणुकीनंतर वाढते रुग्णांची संख्याविसर्जन मिरवणुकीनंतरच्या दोन-तीन दिवसांत आमच्याकडे येणाºया रुग्णांमध्ये दरवर्षी मोठी वाढ होताना दिसून येते़, असे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. अजूनही आपल्याकडे कानाची काळजी घेण्याबाबत फारशी जागृती नाही़ त्यामुळे विसर्जन मिरवणुकीनंतर आपापल्या घरी गेल्यानंतर दुसºया तिसºया दिवशी त्यांना ऐकण्याचा त्रास होऊ लागला की ते जवळच्या डॉक्टरकडे जातात़ अनेक जण घरच्या घरी उपचार करतात़ खूप त्रास होऊ लागल्यावरच ते कानाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे येतात़ तोपर्यंत ते दुखणे वाढलेले असते़ त्यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.कान-नाक -घसातज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले, ‘‘डीजेच्या आवाजाचा विशेषत: लहान मुलांना खूप त्रास होतो. मिरवणूक संपल्यानंतर कानाला सूज आल्याच्या, कान फुटल्याच्या, तसेच बधिरपणा जाणवत असल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण येतात. विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेकदा स्पीकरच्या भिंतीना मुले, तरूण चिकटून बसलेले दिसतात. त्याचबरोबर डीजेसमोर नाचणारे कार्यकर्ते, ट्रॅक्टरचालक, पोलीस, होमगार्ड यांना मिरवणूक संपल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवण्यास सुरुवात होते. नैसर्गिक ध्वनिलहरीपेक्षा जास्त प्रमाणात स्पंदने कानावर पडल्यास त्याचे गंभीर परिणाम संभवतात. कानाच्या समस्येबरोबरच चिडचिड होणे, मानसिक संतुलन ढासळणे अशा तक्रारी रुग्णांकडून येतात.’’

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणे