शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:36 IST

ससून रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी सातवे प्रत्यारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देदेणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपणासाठी ५ रुग्ण नोंदणी प्रक्रियेत अजून १५ रुग्ण ससूनच्या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीवर

पुणे : पत्नीने किडनी देऊन पतीचे प्राण वाचविल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. पण पतीने पत्नीला किडनी दान करून तिला जीवनदान देत समाजात आदर्श घालून दिला आहे. ससून रुग्णालयामध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.ससून रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी सातवे प्रत्यारोपण करण्यात आले. तर जिवंत दाता असलेले हे तिसरे प्रत्यारोपण ठरले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील महादेवनगर येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या ४२ वर्षीय पत्नी गृहिणी आहेत. त्यांना २०११ पासून किडनी विकार झाला होता. त्यासाठी खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. काही कालावधीनंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात ससूनमध्ये डायलिसिस सुरु करण्यात आले. किडनीची स्थिती पाहता ससूनच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्या व्यक्तीच्या पत्नीला किडनी देण्यासाठी लगेचच संमती दिली.किडनी देणाऱ्या व्यक्तीचा हडपसर येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगा असून तो वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांच्याच खांद्यावर घराची संपुर्ण जबाबदारी आहे. तेच किडनी दाता असल्याने किडनी प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे देणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या पथकामध्ये डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. भालचंद्र काश्यपी, अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. अमित बंगाळे, डॉ. सागर भालेराव, डॉ. शंकर मुंडे, डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. रोहित संचेती, डॉ. सुरज जाधवर यांचा समावेश होता. तसेच डॉ. हरीश टाटिया, एम. बी. शेळके, सय्यद सिस्टर, अवयव प्रत्यारोपन समन्व्यक अर्जुन राठोड यांनी सहकार्य मदत केले.  .................पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदानकिडनी दाता हेच कुटूंबाचे आधार असल्याने त्यांची शस्त्रक्रिया देणगीच्या माध्यमातून करण्यात आली. अजून १५ रुग्ण ससूनच्या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. तर यकृत प्रत्यारोपणासाठी ५ रुग्ण नोंदणी प्रक्रियेत आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घेतल्यास प्रत्यारोपनाचा खर्च न परवडणारी कुटुंबे प्रत्यारोपणाचा पर्याय स्वीकारतील.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता , ससून रुग्णालय -----

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल