शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 05:06 IST

भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्याचा अट्टहास असणाºया नगरपालिकेच्या पदाधिाकरी, नगरसेवकांना हा प्रश्न सुटत नाही.

बारामती : बारामती शहरातील भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी गाड्या दिवसभर उभ्या असतात. त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन आलेल्या गाड्यांमधील माल उतरविण्याचे काम सुरू असते. चारचाकी वाहनचालक अगदी सहजपणे रस्त्यावरच गाडी लावून जातो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. छत्रपती शिवाजीमहाराज मार्गावर सतत वर्दळ असते. त्यातून बाहेर पडताना नागरिकांना नाकीनऊ येते.भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्याचा अट्टहास असणाºया नगरपालिकेच्या पदाधिाकरी, नगरसेवकांना हा प्रश्न सुटत नाही. चौकातील जुना व्यापार संकुलाचा अर्धा भाग पाडून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन केले. त्यामुळे अर्धवट काम झाले आहे. जिल्हाधिकाºयांनी त्याला स्थगिती दिली. याच पार्श्वभूमीवर गाळे मूळ गाळेधारकांना परत करण्यात आले. त्यांचे दुकानाचे बोर्ड लावण्यात आले. परंतु, रस्त्यावर पडलेला राडारोडादेखील ठेकेदाराने अथवा नगरपालिकेने उचलला नाही. त्यामुळे मूळ उद्देशच बाजूला राहिला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर कमालीची अतिक्रमणे आहेत. इंदापूर चौकाची (अहिल्यादेवी चौक) वेगळी परिस्थिती नाही. चौकातच भयानक स्थिती आहे. या चौकातून दोन्ही बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि गणेश मंडई गुणवडी चौकातून चालणेदेखील मुश्कील होते. हा मार्ग शहरातून जाणारा राज्यमार्ग आहे.मंडईचा बहुमजली पार्किंग तळ बंदच...1येथील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी बारामती नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बहुमजली मंडई बांधली. त्याचे आॅक्टोबर २०१७ मध्ये उद्घाटन झाले. या इमारतीत चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्किंगसाठी वाहनतळ बांधला आहे. मात्र, उद्घाटनानंतर मागील सहा महिन्यांपासून वाहनतळ बंदच ठेवण्यात आला आहे. वाहनतळ ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ आहे. या तत्त्वावर खुला करण्याचा प्रस्ताव आहे.2या प्रस्तावाची मान्यता येईपर्यंत नागरिकांना सुरुवातीच्या काळात मोफत वाहनतळ उपलब्ध करून द्या, अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यामध्ये राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र त्याला ज्येष्ठांनी विरोध केला. त्यामुळे मंडई समोरील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मंडईच्या गाळेवाटपाचे कामदेखील थांबले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मंडईसमोरील वाहतूक व्यवस्था कठीण होत आहे. 

टॅग्स :Parkingपार्किंग