शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ; फडांना पॅकेज द्या : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:22 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द

ठळक मुद्देतमाशा ही महाराष्ट्राची लोककला : नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन

खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांवर आलेली उपासमारीची वेळ थांबविण्यासाठी तमाशा फडमालक व तमाशा कलावंतांना सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने या गावांमध्ये आयोजिलेले लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण झालेल्या बुकिंग, सुपाऱ्यादेखील मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातदेखील खासदार डॉ. कोल्हे यांनी तमासगिरांची व्यथा मांडली असून, राज्यशासनाने तमाशा कलावंतांसह फडमालकांनाही विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. तमाशा कलावंतांनी आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रात जनजागृतीसोबतच करून समाजभानदेखील निर्माण केले आहे. यात्रेच्या काळात तमाशा कलावंत गावोगावी जाऊन नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन करतात. कोरोनामुळे अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे अनके तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. यामुळे तमाशातील कलावंत व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिकमंत्र्यांनी तमाशा फडमालक व कलावंतांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि तमाशा फडमालक व कलावंतांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली.संपूर्ण महाराष्ट्रात हंगामी आणि कायमस्वरूपी असणारे सुमारे ३८५ तमाशा फड आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावोगावच्या रद्द होत असलेल्या यात्रांमुळे तंबूच्या प्रत्येक तमाशा फडाचं सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, तर प्रत्येक छोट्या  तमाशा फडाचं सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व तमाशा फडांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे...............मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले निवेदनखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तमाशा कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज देण्याची मागणी केली. शिवकाळापासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारी लोककला म्हणून तमाशा आणि लोकनाट्य प्रसिद्ध आहे. याचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनही सर्वतोपरी प्रयत्न करीत असते; पण मागील तीन वर्षे सतत नुकसानीत गेल्याने ही लोककला जगविण्यासाठी सरकारने तमाशा फडांना व कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे.............

टॅग्स :narayangaonनारायणगावartकला