पुणे : जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या महिला बचत गटांना आॅगस्ट २०१७ पासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे पोषण आहार बनविणाऱ्या बचत गटातील महिलांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे हा आहारच शिजविण्यास आता हे स्वयंपाकी नकार देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे पोषण आहार शिजवायचा कुणी? हा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.हे मानधन त्वरित जमा करावे, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक) शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी नाईकरे यांना विचारले असता, शासनाने मानधन वर्ग करण्याच्या नियमात केलेल्या बदलामुळे ते रखडले होते. मात्र सोमवारीच दोन महिन्यांचे मानधन पूर्वीप्रमाणे खात्यात वर्ग केले असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी तीन महिन्यांचे मानधान रखडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शालेय पोषण आहार योजना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविली जाते. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर महिला बचत गटाच्या स्वयंपाकी व मदतनीस हे काम करतात. इ. १ ली ५ वीच्या विद्यार्थ्यांना भाजीपाला, पूरक आहार, इंधन खर्चापोटी १ रुपये ५१ पैसे, तर ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना भाजीपाला, पूरक आहार व इंधन खर्चापोटी २ रुपये १७ पैसे इतका खर्च दिला जात आहे. हे अनुदान यापूूर्वी गटशिक्षणाधिकारी खात्यावरून केंद्रप्रमुख खात्यावर वर्ग केले जात असे व केंद्रप्रमुख नंतर ते अनुदान शाळांच्या शालेय पोषण आहार खात्यावर जमा करीत असत. परंतु आॅगस्टपासून यामध्ये बदल करून केंद्रप्रमुख खात्यावर अनुदान जमा करणे बंद केले असून गटशिक्षणाधिकारी पातळीवरून ते प्रत्येक शाळेच्या शालेय पोषण आहार खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेच्या शालेय पोषण आहाराचा खाते क्रमांक केंद्रप्रमुखांमार्फत संकलित करून बी. ई. ओ. लॉगइनला सेव्ह करण्याचे काम केले आहे. परंतु आॅगस्ट २०१६ पासून अद्यापही शालेय पोषण आहाराचे मानधन जमाच झाले नाही. त्यामुळे आता पुन्हा जुन्याच पद्धतीने ते जमा करण्याचे शासनाने ठरविले आहे. या सावळागोंधळात मात्र ते शिजविणाऱ्या स्वयंपाक्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे बचत गटांच्या महिला आहार शिजविण्यास असमर्थता दाखवू लागल्या आहेत. प्रशासनाची उदासिनताशालेय पोषण आहाराची देयके शिक्षकांकडून वेळेत केंद्रप्रमुखांकडे व केंद्रप्रमुखांकडून पंचायत समितीला सादर होतात. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही बिले महिला बचत गटांना वेळेवर मिळू शकत नाही.असे मिळते मानधन...१ ते २५ पटासाठी १ हजार२६ ते १९९ पटासाठी २ हजार२०० ते २९९ पटासाठी ३ हजार३०० ते ३९९ पटासाठी ४ हजार४०० ते ४९९ पटासाठी ५ हजारकाय कामे करावी लागतातवाटाणा, चवळीची उसळ, वाटाणाभात असा मेनू असतो. यासाठी धान्य निवडणे, साफ करणे.भोजन तयार करणे.जेवण झाल्यावर साफसफाई करून परिसर स्वच्छ करणे, भांडी घासणे.
पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांची उपासमार
By admin | Updated: February 1, 2017 04:36 IST